कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाद्वारे नाशिक आणि पुण्यात डिजिटल जीवन प्रमाणपत्र (डीएलसी ) मोहीम 4.0 चे आयोजन
Posted On:
04 NOV 2025 8:27PM by PIB Mumbai
पुणे, 4 नोव्हेंबर 2025
निवृत्तीवेतनधारकांना डिजिटली सक्षम करण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाअंतर्गत कर्मचारी, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाचा निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग 1 ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र (डीएलसी) मोहीम 4.0 राबवत आहे.

या मोहिमेचा एक भाग म्हणून, निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचे अवर सचिव दीपक गुप्ता यांनी अनुक्रमे 3 आणि 4 नोव्हेंबर रोजी नाशिक आणि पुणे येथील डीएलसी शिबिरांना भेट दिली. या भेटीदरम्यान, गुप्ता यांनी डिजिटल सेवांचा लाभ घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांशी संवाद साधला. निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकच्या प्रतिनिधींसह, फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्यात मदत केली आणि प्रक्रिया सविस्तरपणे समजावून सांगितली.
3 नोव्हेंबर रोजी, घोटी टपाल कार्यालय आणि बँक ऑफ महाराष्ट्र, इगतपुरी येथे शिबिरे आयोजित करण्यात आली होती, ज्यांना स्थानिकांचा उत्साही प्रतिसाद आणि मोठा सहभाग मिळाला. या उपक्रमाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 4 नोव्हेंबर रोजी, पुण्यात बाजीराव रोड, स्टेशन रोड आणि आयडीसी, येरवडा येथे अशाच प्रकारची शिबिरे आयोजित करण्यात आली होती.
संतृप्तता दृष्टिकोन स्वीकारत, ही मोहीम भारतातील 2,000 हून अधिक शहरे आणि गावांमध्ये राबवण्यात येत आहे , ज्यामुळे निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र विविध सोयीस्कर डिजिटल पद्धतींद्वारे सादर करता येते.

याआधीच्या यशाच्या आधारे डीएलसी मोहीम 4.0 मध्ये 2021 मध्ये सुरु केलेल्या आधार-आधारित फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला जात आहे. या नवोन्मेषामुळे निवृत्तीवेतनधारकांना घरी बसून , स्मार्टफोन वापरून त्यांचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करता येते, ज्यामुळे बँका किंवा कार्यालयांना प्रत्यक्ष भेट देण्याची गरज नाही.
समावेशकता सुनिश्चित करण्यासाठी, टपाल विभागाच्या अंतर्गत आयपीपीबी , वयोवृद्ध नागरिक आणि दिव्यांग निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या दारी डीएलसी सेवा प्रदान करत आहे. दरम्यान, बँका, निवृत्तीवेतनधारक संघटना आणि क्षेत्रीय कार्यालये डिजिटल सादरीकरण प्रक्रियेद्वारे निवृत्तीवेतनधारकांना मार्गदर्शन करण्यासाठी देशभरात जागरूकता शिबिरे आयोजित करत आहेत.
VC06.jpeg)
दीपक गुप्ता म्हणाले की, डीएलसी मोहीम 3.0 (2024) दरम्यान, 1.62 कोटींहून अधिक डिजिटल जीवन प्रमाणपत्रे यशस्वीरित्या तयार करण्यात आली , ज्यामध्ये फेस ऑथेंटिकेशनद्वारे 50 लाख जीवन प्रमाणपत्रांचा समावेश आहे. या यशाने प्रेरित होऊन, विद्यमान मोहीम 4.0 मध्ये विक्रमी सहभाग पहायला मिळत आहे, बँका, आयपीपीबी, यूआयडीएआय, एमईआयटीवाय, सीजीडीए, रेल्वे आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण संघटना यांच्या संयुक्त प्रयत्नातून 2 कोटी डीएलसीचे लक्ष्य साध्य होण्याची अपेक्षा आहे.
शैलेश पाटील/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2186453)
अभ्यागत कक्ष : 77