ऊर्जा मंत्रालय
ई.सत्य कुमार फणी यांनी एनटीपीसीच्या क्षेत्रीय कार्यकारी संचालकपदाचा (पश्चिम विभाग -I) अतिरिक्त कार्यभार स्वीकारला
प्रविष्टि तिथि:
03 NOV 2025 7:54PM by PIB Mumbai
मुंबई, 3 नोव्हेंबर 2025
ई.सत्य कुमार फणी यांनी आज दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी क्षेत्रीय कार्यकारी संचालकपदाचा (पश्चिम विभाग -I) अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे. त्यांच्या सध्याच्या कार्यकारी संचालक (डीआरसी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (युपीएल) या पदांच्या विद्यमान कार्यभारासोबतच आता ही अतिरिक्त जबाबदारी ते सांभाळतील.

उर्जा क्षेत्रातील 35 वर्षांचा अनुभव असलेले फणी विशाखापट्टणम् येथील आंध्र विद्यापीठाची इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन्स अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक तसेच नवी दिल्ली इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची मनुष्यबळ व्यवस्थापन विषयातील एमबीए पदवीधारक आहेत. दिनांक 28 फेब्रुवारी 1989 रोजी कार्यकारी प्रशिक्षणार्थी म्हणून राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळाच्या (एनटीपीसी) सेवेत प्रवेश केलेल्या फणी यांनी वीजनिर्मिती आणि प्रकल्प व्यवस्थापन या क्षेत्रांशी विविध संबंधित कार्यांमध्ये मोठे योगदान दिले.
त्यांनी यापूर्वी विंध्याचल रामगुंडम एनटीपीसी कॉर्पोरेट केंद्र- ईओसी मध्ये पश्चिम – II विभागाचे क्षेत्रीय कार्यकारी संचालक म्हणून काम केलेले आहे.धोरणात्मक नेतृत्व आणि लोक-केंद्री दृष्टिकोनासाठी प्रसिध्द असलेल्या फणी यांनी नेहमीच एनटीपीसीच्या प्रकल्पांमध्ये परिचालनात्मक उत्कृष्टता, शाश्वतता आणि कर्मचारी सहभाग यांना चालना दिली आहे.
निलीमा चितळे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2186041)
आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English