संरक्षण मंत्रालय
भारतीय लष्कराकडून ‘वायू समन्वय-II’ चे आयोजन, वाळंवटी भागातील एक महत्त्वाचा ड्रोन आणि ड्रोन-प्रतिबंधक युद्धसराव
प्रविष्टि तिथि:
01 NOV 2025 5:05PM by PIB Mumbai
भारतीय लष्कराने 28 ते 29 ऑक्टोबर 2025 या कालावधीत दक्षिण कमांडच्या नेतृत्वाखाली वाळवंटी क्षेत्रातील आघाडीच्या भागात 'वायू समन्वय-II' नावाच्या व्यापक ड्रोन आणि ड्रोन- प्रतिबंधक सरावाचे यशस्वी आयोजन केले. हा सराव विविध हवाई आणि जमिनीवरील संसाधनांचे एकत्रीकरण करून तसेच बहु-क्षेत्रीय कमांड आणि नियंत्रण केंद्रांचे एकत्रिकरण करून, वास्तवासारख्या, इलेक्ट्रॉनिक युद्धनीतीचा वापर असलेल्या आणि अनेक शत्रूंना, अनेक स्तरांवर तोंड द्यावे लागणाऱ्या परिचालनात्मक वातावरणात, भविष्यातील युद्धतंत्रासाठी भारतीय लष्कराची सज्जता प्रमाणित करण्यासाठी तयार करण्यात आला होता.

या दोन दिवसीय सरावात ड्रोन आणि ड्रोन-प्रतिबंधक कारवायांसाठी कागदावरील डावपेच विकसित करणे आणि त्यांची चाचणी करणे यावर भर देण्यात आला, ज्यामुळे नव्याने तयार होणाऱ्या हवाई धोक्यांविरुद्ध भारतीय लष्कराची प्रतिसाद क्षमता बळकट झाली. वाळवंटी क्षेत्र आणि हवामानाच्या स्थितीमुळे दोन्ही प्रकारच्या कारवायांसाठी एक आदर्श चाचणी तळ उपलब्ध झाला.
‘वायू समन्वय-II' ने भारतीय लष्कराच्या विविध शाखांमध्ये संयुक्त आंतरपरिचालनक्षमतेचे देखील दर्शन घडवले, ज्यामुळे आघाडीच्या संवेदनशील सीमावर्ती प्रदेशांमध्ये तंत्रज्ञान-सक्षम परिचालनासाठी समन्वय बळकट झाला. या सरावामुळे सैनिकांना परिचालनात्मक वातावरणात स्वदेशी तंत्रज्ञानासह प्रयोग करता आले.

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, पीव्हीएसएम, एवीएसएम, जनरल ऑफिसर-इन-कमांडिंग चीफ, दक्षिण कमांड यांनी 'वायू समन्वय-II' सरावाच्या यशाबद्दल अभिनंदन केले. 'वायू समन्वय-II' सरावातून मिळालेले धडे थेट क्षमता विकास आणि भारतीय लष्करामध्ये ड्रोन आणि प्रति-ड्रोन प्रणालींच्या जलद समावेशासाठी योगदान देतील. हा सराव बहु-क्षेत्रीय वातावरणात आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगिकार करण्याच्या भारतीय लष्कराच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
भारतीय लष्कर आपल्या परिचालन क्षमतांचे आधुनिकीकरण करण्यासाठी, नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व क्षेत्रांमध्ये उदयाला येत असलेल्या धोक्यांचा सामना करण्यासाठी तयारी सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे. हा सराव, विकसित होत असलेल्या युद्धभूमीवर प्रभुत्व मिळवण्यास सक्षम, तंत्रज्ञान-आधारित, चपळ आणि भविष्य-सज्ज दल तयार करण्याच्या भारतीय लष्कराच्या दृष्टिकोनाची हमी देत आहे.
***
माधुरी पांगे/शैलेश पाटील/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2185348)
आगंतुक पटल : 40
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English