पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ब्रुनेईच्या सुलतान यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन

प्रविष्टि तिथि: 04 SEP 2024 3:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 सप्‍टेंबर 2024

 

महामहिम,

आपल्या भावपूर्ण शब्दांसाठी, उत्साहपूर्ण स्वागत आणि आदरआतिथ्य सत्कारातसाठी, मी आपले आणि संपूर्ण शाही कुटुंबाचे मनापासून आभार मानतो.

सर्वात आधी मी आपल्याला आणि ब्रुनेईच्या नागरिकांना स्वातंत्र्याच्या 40 व्या वर्धापनदिनानिमित्त 140 कोटी भारतवासियांच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

महामहिम,

आपल्यात शतकानुशतका जुने सांस्कृतिक संबंध आहेत. आपल्या मैत्रीचा आधार आपली ही महान सांस्कृतिक परंपरा आहे. आपल्या नेतृत्वाखालील आपल्यातले संबंध दिवसागणिक अधिक दृढ होत आहेत. 2018 मध्ये आमच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपण भारताला दिलेल्या भेटीच्या आठवणींचे आजही भारताचे नागरिक मोठ्या अभिमानाने स्मरण करतात.

महामहिम,

मला अत्यंत आनंद आहे की, मला माझ्या तिसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच ब्रुनेईला भेट देण्याचे आणि आपल्यासोबत भविष्यासंबंधी विषयांवर चर्चा करण्याचे सौभाग्य लाभले. हा देखील एक सुखद योगायोग आहे की, या वेळी आपण द्विपक्षीय भागीदारीची 40 वी वर्षपूर्ती साजरी करत आहोत. भारताची Act East Policy आणि Indo-Pacific Vision च्या बाबतीत ब्रुनेई हा एक महत्वाचा भागीदार असणे, हीच आपल्या उज्ज्वल भविष्याची हमी आहे. आपण परस्परांच्या भावनांचा आदर करतो. मला विश्वास आहे की, माझ्या या भेटीमुळे आणि आपल्यातील चर्चेमुळे आगामी काळात आपल्यातील संबंधांना धोरणात्मक दिशा मिळेल. पुन्हा एकदा या निमित्ताने मी आपले हृदयापासून खूप खूप आभार व्यक्त करतो.

 

* * *

नेहा कुलकर्णी/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2185021) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam