अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय युनिटने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 47 कोटी रुपये किमतीचे 4.7 किलो कोकेन जप्त केले; पाच जणांना केली अटक

Posted On: 31 OCT 2025 9:25PM by PIB Mumbai

मुंबई, 31 ऑक्टोबर 2025 

 

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय युनिटने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोलंबोहून आलेल्या एका महिला प्रवाशाकडून 4.7 किलो कोकेन जप्त केले. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी संबंधित प्रवासी महिलेच्या सामानाची कसून तपासणी केल्यावर कॉफीच्या पॅकेटमध्ये लपवलेले पांढऱ्या भुकटीचे नऊ पाउच सापडले. एनडीपीएस फील्ड टेस्ट किट वापरून जप्त केलेल्या पदार्थाची चाचणी केल्यावर, तो पदार्थ कोकेन असल्याचे सिद्ध झाले.

जलद गतीने  कारवाई करत, अधिकाऱ्यांनी विमानतळावर ज्या व्यक्तीकडे हे अमली पदार्थ सोपवले जाणार होते, त्याला ताब्यात घेतले. पुढील तपासात या टोळीच्या इतर तीन सदस्यांना अटक करण्यात आली. प्रतिबंधित पदार्थांसाठी वित्तपुरवठा, लॉजिस्टिक्स, संकलन आणि वितरण यामध्ये त्यांचा सहभाग होता.

या पाचही जणांना नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. अंमली पदार्थांच्या  पुरवठा साखळ्या अथकपणे तोडून, आंतरराष्ट्रीय तस्करांच्या टोळ्या नष्ट करून आणि देशाचे आरोग्य, सुरक्षा आणि भविष्य सुरक्षित करून, महसूल गुप्तचर संचालनालयाने ‘नशा मुक्त भारत’ बनवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुषमा काणे/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2184957) अभ्यागत कक्ष : 23
Read this releasein: English