संरक्षण मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        भारतीय तटरक्षक दलासाठी महत्त्वपूर्ण टप्पा: दोन वेगवान गस्ती जहाजांच्या निर्माण कार्याचा प्रारंभ आणि दोन ‘एअर कुशन’ जहाजाचे गर्डर टाकण्याचे काम सुरू
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                30 OCT 2025 8:30PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2025
 
भारतीय तटरक्षक दलाच्या (आयसीजी) एकूण  14 वेगवान  गस्ती जहाज (एफपीव्ही) निर्माण प्रकल्पांतर्गत दुसऱ्या वेगवान गस्ती जहाजाच्या (एफपीव्ही) निर्माण कार्याचा प्रारंभ करण्यात आला.  तर पाचव्या वेगवान  गस्ती जहाजाचा (एफपीव्ही) ‘प्लेट कटिंग’  कार्यक्रम 30 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) येथे पार पडला. याव्यतिरिक्त, भारतीय तटरक्षक दलाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या स्वदेशी निर्मित एअर कुशन व्हेईकल्स (एसीव्ही) साठी गर्डर टाकण्याचा समारंभ गोव्यातील चौगुले यांच्या रासाईम यार्ड येथे आयोजित करण्यात आला होता.
24 जानेवारी 2024 रोजी 60% स्वदेशी सामग्री असलेल्या 14 एफपीव्ही च्या डिझाइन आणि बांधणीचा करार करण्यात आला होता. प्रत्येक एफपीव्ही मध्ये म्हैसूरस्थित मेसर्स त्रिवेणी यांनी तयार केलेले स्वदेशी बनावटीचे गिअरबॉक्स आणि मेसर्स एमजेपी इंडिया यांनी विकसित केलेले वॉटर जेट्स बसवण्यात आले आहेत. या वॉटर-जेट प्रोपेल्ड जहाजांमध्ये सुमारे 340 टन वहन क्षमता,  सागरी सुरक्षेसाठी शोध तसेच बचाव कार्यासाठी आणि इतर नियमांनुसार अंमलबजावणीसाठी डिझाइन करण्यात आले आहेत. या जहाजांमध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसवली जाईल, ज्यामध्ये कृत्रिम प्रज्ञेवर  आधारित पूर्वानुमान देखभाल प्रणाली आणि बहुउद्देशीय ड्रोन यांचा समावेश असेल. यातून भारताच्या सागरी संरक्षण क्षमतांमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश अधोरेखित होतो.
सहा एअर कुशन व्हेईकल्स (एसीव्ही) साठीच्या करारावर 24 ऑक्टोबर 2024 रोजी स्वाक्षरी करण्यात आली होती. हे एसीव्ही ग्रिफॉन हॉवरवर्क (यूके) यांच्यात प्रमाणित डिझाइनवर आधारित आहेत आणि त्यात 50% पेक्षा जास्त स्वदेशात निर्माण होणारे  घटक वापरलेले आहेत. ही वाहने अत्यंत वेगाने गस्त घालणे, टेहळणी, अडथळ्यांना अटकाव,  प्रतिबंध आणि सर्व हवामानातील शोध आणि बचाव कार्य करण्यास सक्षम असतील. या एसीव्ही उथळ पाण्यात, दलदलीत आणि खुल्या समुद्रातही सहज हालचाली करणाऱ्या असल्यामुळे तटरक्षक दलाच्या तत्पर प्रतिसाद क्षमतेत आणि अखंड गतिशीलतेत मोठी भर पडेल. या एसीव्ही कार्यान्वित झाल्यानंतर भारताच्या किनारी सुरक्षा पायाभूत सुविधांमध्ये एक मोठी तांत्रिक झेप दर्शवतील.
एफपीव्ही आणि एसीव्ही हे दोन्ही प्रकल्प देशाच्या 'आत्मनिर्भर भारत' या दृष्टिकोनाशी सुसंगत आहेत आणि ते हिंद महासागर प्रदेशात (आयओआर) भारतीय तटरक्षक दलाची उपस्थिती अधिक बळकट करतील. 
 
* * *
सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com   /PIBMumbai
/PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 2184395)
                Visitor Counter : 5