गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जनगणना -2027. पूर्वचाचणी (घरयादी आणि घरगणना) संदर्भात प्रसिध्‍दीपत्रक

Posted On: 29 OCT 2025 9:20PM by PIB Mumbai

मुंबई, 29 ऑक्टोबर 2025

 

भारत सरकारने २०२७ साली जनगणना घेण्याचा निर्णय आधीच अधिसूचित केला आहे. जनगणनेचा पहिला टप्पा म्हणजे घरयादी व घर गणना (टप्पा-१) हा एप्रिल ते सप्टेंबर, २०२८ वा दरम्यान एका महिन्याच्या कालावधीत पार पडेल. लोकसंख्या गणना (टप्पा-२) फेब्रुवारी, २०२७मध्ये पार पडेल. जनगणना ही जनगणना अधिनियम, १९४८ च्या तरतुदीनुसार केली जाते.

जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, पूर्वचाचणी घेतली जाणार आहे. ज्यामध्ये जनगणनेच्या सर्व पैलूंचा समावेश असेल. जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याची म्हणजे घरयादी व घर गणनेची पूर्वचाचणी ही दिनांक १० नोव्हेंबर, २०२५ ते ३० नोव्हेंबर, २०२५ या कालावधीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केली जाईल. तसेच स्व-गणना करण्याचा पर्याय देखील दिनाक १ नोव्हेंबर, २०२५ ते ७ नोव्हेंबर, २०२५ या कालावधीत उपलब्ध असेल.

महाराष्ट्र राज्यातील घरयादी व धरगणनेची पूर्वचाचणी निवडक तीन नमुना क्षेत्रांमध्ये केली जाणार आहे. पूर्वचाचणी करिता निवडलेली नमुना क्षेत्रे पुढीलप्रमाणे आहेत: जळगाव जिल्ह्यातील चोपडा तहसिल, कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तहसिल, आणि बृहन्मुंबई महानगरपालिकच्या एम/वेस्ट प्रभागातील नमुना क्षेत्र. या नमुना क्षेत्रामध्ये होणाऱ्या जनगणना पूर्वचाचणीसाठी जनगणना अधिनियम, १९४८ च्या तरतुदी लागू राहतील.

निवडक नमूना क्षेत्रातील सर्व उत्तरदाता व सर्वसामान्य नागरिकांना अशी विनंती करण्यात येते की, जनगणनेकरिता नियुक्त केलेल्या प्रगणक व पर्यवेक्षक, जे माहिती संकलनासाठी वाटप केलेल्या क्षेत्रातील घरे व कुटुंबाना भेट देतील, त्यांना योग्य ते सहकार्य करावे. सदर प्रसिध्दीपत्रक सर्व संबंधितांच्या माहितीकरिता जारी करण्यात येत आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2183900) अभ्यागत कक्ष : 199
Read this releasein: English