कोळसा मंत्रालय
वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने विशेष मोहीम 5.0 अंतर्गत 100% उद्दिष्टे केली साध्य
प्रविष्टि तिथि:
24 OCT 2025 3:58PM by PIB Mumbai
कोळसा मंत्रालयाच्या अखत्यारीतील कोल इंडिया लिमिटेडची उपकंपनी असलेल्या वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने 2 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीसाठीच्या स्वच्छता आणि कार्यक्षमतेविषयक विशेष मोहीम 5.0 मोहीमेअंतर्गत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या अंतर्गत या आस्थापनेने नियोजनबद्धता, नवोन्मेष आणि सर्वसमावेशक उपक्रमांच्या माध्यमातून स्वच्छता आणि कार्यक्षमतेसंबंधी 100% उद्दिष्टे साध्य केली आहेत.
या मोहीमेअंतर्गत 5.69 लाख चौरस फूट क्षेत्र इतक्या व्याप्तीच्या एकूण 257 ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. याअंतर्गत 223 मेट्रिक टन भंगाराची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली गेली, याअंतर्गत पुनर्निर्मिती आणि पुनर्वापराद्वारे 1.43 कोटी रुपये महसूलही प्राप्त केला.
या मोहीमेच्या निमीत्ताने वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने आपल्या कार्यक्षेत्रांमध्ये सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब केला, यातून या आस्थापनेच्या संख्यात्मक पातळीवरच्या यशासोबतच, सर्जनशीलता, टिकाऊपणा आणि सर्वसमावेशकते प्रती असलेल्या वचनबद्धतेचेही दर्शन घडले. टाकाऊ लोखंडी आणि पोलादी सामानाचा वापर करून ई-कचरा संकलन केंद्र तयार करण्यात आली होती. यामुळे अशा वस्तूंच्या जबाबदारपूर्ण पुनर्वापराला आणि चक्रीय अर्थव्यवस्थेशी संबंधितीत सवयींनाही प्रोत्साहन मिळाले. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी ई कचऱ्यापासून कलाकृती निर्मितीची कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले होते. याद्वारे सर्जनशीलता तसेच शाश्वतता आणि पुनर्वापराबद्दल जागरूकतेला प्रोत्साहन मिळाले. वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडशी संबंधित अनेक परिसरात जैव शौचालयेही स्थापित करण्यात आली आहेत. यामुळे स्वच्छता आणि आरोग्यविषयक सुधारित मानकांची अंमलबजावणी सुनिश्चित झाली आहे. वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या अखत्यारितील कार्यक्षेत्रा अंतर्गत 'सफाई मित्र शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते. या शिबीरांअंतर्गत 1,250 हून अधिक कंत्राटी कामगारांना आणि साफसफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली गेली, तसेच त्यांना सुरक्षा संचाचे वाटपही केले गेले. या सोबतच माजरी इथल्या एकोना खाण क्षेत्रात महिलांद्वारे चालवल्या जाणाऱ्या मनुष्यबळ कक्षाची स्थापनाही करण्यात आली. यामुळे संस्थेअंतर्गत सर्वसमावेशकता, सक्षमीकरण आणि नेतृत्वाच्या संधीला बळकटीही मिळाली आहे.
वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने विशेष मोहीम 5.0 अंतर्गत राबवलेल्या उपक्रमांतून स्वच्छता, सर्जनशीलता आणि सामुदायिक कल्याणाचा यशस्वी मिलाफ साधला गेला. ही संस्था आपली पालक यंत्रणा असलेल्या कोळसा मंत्रालयाच्या स्वच्छ आणि अधिक उत्तरदायी भविष्याच्या दृष्टिकोनात महत्त्वपूर्ण योगदान देत आली असून, त्यादृष्टीनेच शाश्वत कार्यपद्धती, सर्वसमावेशकता आणि नवोन्मेषाच्या आधारे कचऱ्याचे साधनसंपत्तीत रूपांतर करण्यासाठी वचनबद्ध आहे. त्यामुळेच आस्थापनाने सार्वजनिक क्षेत्रातील एक आदर्श उपक्रम म्हणून आपले स्थान कायम राखले आहे.

***
निलिमा चितळे / तुषार पवार / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2182249)
आगंतुक पटल : 39
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English