आदिवासी विकास मंत्रालय
नेस्ट्स (NESTS) ने सादर केले शैक्षणिक आणि सांस्कृतिक नवोन्मेष; GI-टॅग्ड चित्रसंग्रह आणि शैक्षणिक रोजनिशींचेही केले अनावरण
Posted On:
22 OCT 2025 10:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर 2025
राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण संस्थेने (नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्स-NESTS) आज दिल्ली येथील आपल्या मुख्यालयात एक विशेष कार्यक्रम आयोजित केला. यामध्ये त्यांनी आपले ज्ञान व्यवस्थापन, क्षमता विकास, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम सादर केले.
विभू नायर, सचिव, आदिवासी कार्य मंत्रालय, यांनी भौगोलिक ओळख मानांकन प्राप्त(GI-टॅग्ड) आदिवासी चित्रसंग्रह (पेंटिंग अल्बम) तसेच शिक्षक/विद्यार्थी/विद्यार्थी वर्ग प्रमुखांसाठीच्या (क्लास मॉनिटर्स) शैक्षणिक रोजनिशींचे (डायरी) आणि एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स (EMRSs) या एकलव्य मॉडेल निवासी शाळां साठीच्या परिपत्रक संकलनाचे अनावरण केले. या विशेष उपक्रमात,ईएमआरएस विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली आणि GI - टॅग्ड चित्र प्रत्यक्ष जिवंत करून दाखवत आपली गुणवत्ता दाखवून दिली. या उपक्रमाचा गौरव म्हणून GI-टॅग्ड चित्रसंग्रह — Canvas of Tribal Culture प्रकाशित करण्यात आला. या चित्रांचे प्रदर्शन नोव्हेंबर 2025 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

नेस्ट्स, शैक्षणिक आणि इतर उपक्रमांच्या देखरेखीचे नियोजन सुलभ करण्यासाठी डायरी सुरू करत आहे. शिक्षक डायरी, शिक्षणातील चिंतनशील दृष्टीकोन वाढवते, शिक्षकांना प्रगतीचा मागोवा घेण्यास, शिक्षकांना धड्यांचे नीट नियोजन करण्यास आणि व्यावसायिक विकासात प्रगती साधण्यास मदत करते.विद्यार्थी डायरी रोजच्या शैक्षणिक आणि सह-पाठयक्रम उपक्रमांची नोंद ठेवण्याची सवय रुजवते, तसेच आत्मपरीक्षण आणि शिस्त वाढवते.वर्गप्रमुख विद्यार्थी डायरी विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारी आणि संघभावना वाढवते. शाळा व्यवस्थापन, प्रशासन, शैक्षणिक बाबी, बांधकाम (पायाभूत सुविधा उभारणी)इत्यादीसाठी नेस्ट्स विविध परिपत्रके जारी करत आहे. ही सर्व परिपत्रके दोन वेगवेगळ्या खंडांमध्ये संकलित करण्यात आली आहेत: खंड I – बांधकाम संबंधित परिपत्रके, आणि खंड II – इतर सर्व परिपत्रके.

नेस्ट्स च्या अधिकार्यांना संबोधित करताना, विभू नायर यांनी नवोन्मेषी आणि सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी यावर भर दिला की अशा प्रयत्नांमुळे सर्वांगीण शिक्षणास प्रोत्साहन मिळते, सृजनशीलतेला चालना मिळते आणि विद्यार्थ्यांमध्ये आदिवासी वारशाबाबत अभिमानाची भावना निर्माण होते. देशभरातील आदिवासी युवकांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी नेस्ट्सचे अधिकारी, EMRS चे मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या सततच्या प्रयत्नांबद्दल, त्यांनी प्रशंसा केली.
* * *
सुषमा काणे/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2181690)
Visitor Counter : 5