संरक्षण मंत्रालय
एअर मार्शल विजय कुमार गर्ग यांनी अमला वायू दल स्थानकाच्या कर्मचारी आणि कुटुंबासह साजरी केली दिवाळी
प्रविष्टि तिथि:
22 OCT 2025 8:55PM by PIB Mumbai
नागपूर, 22 ऑक्टोबर 2025
एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ एअर मार्शल विजय कुमार गर्ग यांनी 19 ऑक्टोबर 2025 रोजी एअरफोर्स फॅमिली वेल्फेअर असोसिएशन रीजनल (एएफएफडब्ल्यूए)च्या अध्यक्षा श्रीमती रितू गर्ग यांच्यासह कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसमवेत दिवाळी साजरी करण्यासाठी, वायू दल स्थानक अमला'ला भेट दिली.
यावेळी एअर मार्शल गर्ग यांनी हवाई योद्धे, डीएससी कर्मचारी आणि सामान्य नागरिकांशी संवाद साधला आणि मिठाई वाटली. त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच सण उत्साहाने आणि सुरक्षिततेने साजरा करण्याचे आवाहन केले. श्रीमती रितू गर्ग यांनी एका स्वतंत्र मेळाव्यात संगिनींशीही संवाद साधला.
त्यांनी सर्वांना आनंदी आणि सुरक्षित दिवाळी, शाश्वत यश, शांतता आणि समृद्धीच्या शुभेच्छा दिल्या. अमला एओसी एएफ स्टेशनचे एअर कमांडर महेश यांनी या प्रसंगी आनंद आणि एकतेची भावना निर्माण करणाऱ्या, स्थानकामध्ये आयोजित कार्यक्रमांविषयी माहिती दिली.


* * *
पीआयबी मुंबई | माधुरी पांगे/विजयालक्ष्मी साळवे-साने/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2181676)
आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English