सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
स्वच्छता ही सेवा (एसएचएस) मोहीम 2025
Posted On:
21 OCT 2025 8:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2025
शहरी भागांसाठी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (एमओएचयूए) आणि ग्रामीण भागांसाठी जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभाग (डीडीडब्ल्यूएस) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेली ' स्वच्छता ही सेवा' (एसएचएस) मोहीम 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान गांधी जयंतीपर्यन्त साजरी करण्यात आली. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (एमओएसपीआय) 17 सप्टेंबर 2025 रोजी स्वच्छता प्रतिज्ञा घेऊन ही मोहीम सुरू केली. यामध्ये कार्यालये आणि समुदायांमध्ये स्वच्छतेसाठीची वचनबद्धता पुन्हा अधोरेखित करण्यात आली.
या वर्षीच्या मोहिमेत स्वच्छता लक्ष्य युनिट्स (सीटीयू) चे आदर्श स्वच्छ क्षेत्रांमध्ये रूपांतर करणे आणि जास्त गर्दी असलेल्या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे यावर लक्ष केंद्रित केले गेले. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन देण्यासाठी सफाईमित्रांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली. वैयक्तिक स्वच्छता आणि शाश्वत स्वच्छता पद्धतींवर प्रकाश टाकण्यासाठी एमओएसपीआय आणि त्यांच्या कार्यालयांमध्ये जागरूकता उपक्रम देखील आयोजित करण्यात आले.
मोहिमेदरम्यान, 52 सीटीयू स्वच्छ करण्यात आली आणि 104 सार्वजनिक जागांची स्वच्छता करण्यात आली. यामुळे स्वच्छतेची सुधारित मानके पूर्ण झाल्याचे दिसून आले. व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत स्वच्छता मित्रांसाठी एमओएसपीआय येथे एक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.
25 सप्टेंबर 2025 रोजी देशभरात श्रमदान झाले, यात 2500 हून अधिक अधिकारी आणि स्वयंसेवक स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण आणि जागरूकता उपक्रमांमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या सक्रिय सहभागाने पर्यावरणीय शाश्वततेसाठी एमओएसपीआयची वचनबद्धता आणि स्वच्छ भारताप्रती सामूहिक जबाबदारी दर्शविली. या प्रयत्नांद्वारे, एसएचएस 2025 मोहिमेने सामुदायिक सेवा, पर्यावरणीय देखभाल आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा बळकट केली, स्वच्छ आणि निरोगी भारतासाठी राष्ट्रीय चळवळीला चालना दिली.





माधुरी पांगे/हेमांगी कुलकर्णी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2181359)
Visitor Counter : 6