गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ग्रुप सेंटर, सीआरपीएफ, पुणे येथे ‘पोलीस स्मृतिदिन’चे आयोजन

प्रविष्टि तिथि: 21 OCT 2025 12:10PM by PIB Mumbai

पुणे, 21 ऑक्टोबर 2025

ग्रुप सेंटर, सीआरपीएफ, पुणे येथे 21 ऑक्टोबर 2025 रोजी ‘पोलीस स्मृतिदिन’चे मोठ्या श्रद्धेने व आदराने आयोजन करण्यात आले. या प्रसंगी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs) आणि राज्य पोलीस दलातील त्या शूर वीरांना अभिवादन करण्यात आले ज्यांनी वर्ष 2025 दरम्यान कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान दिले.

या प्रसंगी वैभव निंबालकर, आयपीएस, उपमहानिरीक्षक, ग्रुप सेंटर सीआरपीएफ पुणे यांनी देशभरातील पोलीस शहीदांची नावे वाचून त्यांच्या अमर बलिदानास अभिवादन केले. उपस्थित अधिकारी, कर्मचारी व कुटुंबियांनी राष्ट्राच्या सुरक्षेसाठी प्राणार्पण करणाऱ्या या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

आपल्या भाषणात निंबालकर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या अदम्य शौर्य, निष्ठा आणि त्यागाचे स्मरण करून सांगितले की शहीदांचे बलिदान हे आगामी पिढ्यांना सेवा, धैर्य आणि प्रामाणिकतेच्या सर्वोच्च मूल्यांचे पालन करण्यासाठी प्रेरणा देत राहील.

हा दिवस बलाच्या इतिहासात विशेष महत्त्वाचा आहे. 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाखमधील हॉट स्प्रिंग्स भागात सीआरपीएफच्या छोट्या तुकडीवर चिनी सैन्याने हल्ला केला होता, ज्यात 10 जवान शहीद झाले. त्यांच्या शौर्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशभर ‘पोलीस स्मृतिदिन’ म्हणून साजरा केला जातो.

या प्रसंगी शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले, त्यानंतर ‘शोक परेड’ घेण्यात आली आणि दोन मिनिटे मौन पाळून शहीदांना अभिवादन करण्यात आले. या सोहळ्याने सर्वांना पुन्हा एकदा स्मरण करून दिले की आपल्या पोलीस व सुरक्षा दलांचे समर्पण, साहस आणि निःस्वार्थ सेवा हे राष्ट्राच्या सुरक्षेचे भक्कम प्रतीक आहे.

 

पीआयबी पुणे | हर्षल आकुदे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(रिलीज़ आईडी: 2181118) आगंतुक पटल : 33
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English