रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रेल्वे सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त वलसाड इथे आयोजित संचलनाला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित,पुरस्कार विजेत्या 41आरपीएफ कर्मचाऱ्यांचा केला सत्कार


भारतीय रेल्वेतील महत्त्वाच्या बदलांचा अश्विनी वैष्णव यांनी केला उल्लेख, आरपीएफसाठी नवीन प्रशिक्षण कार्यक्रम व तांत्रिक अद्ययावतीकरणाची घोषणा

Posted On: 13 OCT 2025 10:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर  2025

केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आज रेल्वे सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त वलसाड येथील क्षेत्रिय प्रशिक्षण केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या संचलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमात केंद्रिय मंत्री वैष्णव यांच्या हस्ते प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी  केलेल्या धाडसी प्रयत्नासाठी  राष्ट्रपती पदक, जीवन रक्षा पदक मिळवलेल्या 41 आरपीएफ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. देशातील हे पुरस्कार म्हणजे रेल्वेसेवा सुरक्षित राखण्यामध्ये या सर्वांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाचे प्रतीक आहे. यातून आरपीएफच्या इतर कर्मचाऱ्यांनाही नवीन उत्साहाने काम करत राहण्याची प्रेरणा मिळते.  

वैष्णव यांनी आपल्या भाषणात सर्वप्रथम आरपीएप कर्मचाऱ्यांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या अढळ समर्पण भावनेचे, प्रवाशांच्या व रेल्वेच्या मालमत्तेच्या सुरक्षेप्रतीच्या वचनबद्धतेचे कौतुक केले. नुकत्याच झालेल्या महाकुंभमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेत लाखो भाविकांच्या सुरक्षित व सुरळीत प्रवासासाठी त्यांनी केलेल्या कामाची केंद्रिय मंत्र्यांनी प्रशंसा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय रेल्वेमध्ये ऐतिहासिक स्थित्यंतरे घडत आहेत असे केंद्रिय मंत्री वैष्णव यांनी अधोरेखित केले. गेल्या 11 वर्षांत सुमारे 35,000 किलोमीटरचे नवे रेल्वेमार्ग तयार करण्यात आले आणि रेल्वेजाळ्याचे  99 टक्के (सुमारे 60,000 किमी) विद्युतीकरण करण्यात आले. सध्या जवळपास 150 वंदे भारत आणि 30 अमृत भारत द्रुतगती रेल्वे सुरू आहेत. या गाड्यांमधून प्रवाशांना जागतिक दर्जाच्या प्रवासाचा अनुभव मिळत आहे.  

ते पुढे म्हणाले की, सणांच्या काळातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी दिवाळी आणि छट पूजेच्या काळात विक्रमी 12,000 विशेष रेल्वे सोडण्यात येतील. यामुळे सर्वांनाच सुलभतेने प्रवास करता येईल.

दिल्ली हावडा आणि दिल्ली मुंबई यासारख्या प्रमुख मार्गांवर कवच प्रणाली वेगाने तैनात करण्यात येत आहे हे काम प्रगतीपथावर आहे असे वैष्णव यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, रेल्वे सुरक्षा दलामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे आणि प्रशिक्षणदेखील त्याच अनुषंगाने दिले जात आहे.

रेल्वे सुरक्षा दल देश आणि नागरिकांच्या सेवेप्रती समर्पित आहे. सेवा ही संकल्प या उद्दीष्टाला अनुसरुन समर्पण, तत्परता व परिश्रम यांची ते पराकाष्ठा करत आहेत. “यशो लाभस्व”  या त्यांच्या घोषवाक्यानुसार ते आपल्या कामात कोणतीही कसर ठेवत नाहीत. 

निलीमा चितळे/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2178720) Visitor Counter : 7
Read this release in: English , हिन्दी