सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'हर घर स्वदेशी, घर-घर स्वदेशी' या दृष्टिकोनाला अनुसरून, मुंबईतील केव्हीआयसी मुख्यालयात खादी महोत्सव 2025 चे उद्घाटन
31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे केव्हीआयसीचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी केले उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
09 OCT 2025 3:24PM by PIB Mumbai
मुंबई, 9 ऑक्टोबर 2025
भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) अध्यक्ष मनोज कुमार यांनी आज मुंबईतील केव्हीआयसीच्या मध्यवर्ती कार्यालयात खादी महोत्सव 2025 चे उद्घाटन केले. याप्रसंगी, खादी उत्पादनांवर 20% आणि ग्रामोद्योग उत्पादनांवर 10% सूट जाहीर करण्यात आली. हा महोत्सव 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत सुरू राहील. खादी महोत्सव 2025, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशीच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक पाऊल म्हणून, "हर घर स्वदेशी, घर-घर स्वदेशी" आणि "गर्व से कहो ये स्वदेशी है" या संदेशाचा प्रचार करेल. या महोत्सवात विविध प्रदर्शने, कार्यशाळा आणि खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांचे थेट प्रात्यक्षिक दाखवली जातील, ज्यातून लोकांना स्वदेशी उत्पादने वापरण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. या कार्यक्रमाला केव्हीआयसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूप राशी, संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य दक्षता अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी, खादी उद्योजक, कारागीर आणि देशभरातील मान्यवरांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या क्षेत्राच्या वाढीवर प्रकाश टाकताना, मनोज कुमार यांनी नमूद केले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दशकात खादी आणि ग्रामोद्योगाने लक्षणीय प्रगती साधली आहे. या क्षेत्रातील उत्पादन 27,000 कोटी रुपयांवरून 1,16,000 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे तर विक्री 33,000 कोटी रुपयांवरून 1,70,000 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.

"सेवा आणि स्वदेशी ही नव्या भारताची ताकद असून 2047 पर्यंत विकसित भारताच्या निर्मितीचा पाया आहे, असे मनोज कुमार याप्रसंगी म्हणाले. सर्व देशवासीयांनी आपल्या दैनंदिन जीवनात स्वदेशी कपडे आणि उत्पादनांचा स्वीकार करण्याचे आणि स्वदेशी मोहिमेला एक लोकचळवळ बनवण्याचे आवाहन मनोज कुमार यांनी केले. या कार्यक्रमाला ऐतिहासिक यश मिळवून देण्यासाठी त्यांनी सर्व सहभागींना शुभेच्छा दिल्या.
सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2176783)
आगंतुक पटल : 41
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English