माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारताच्या प्रसारण क्षेत्रासाठी संतुलित नियम प्रणाली, नवोन्मेष व डिजिटल विस्तार आवश्यक असल्याचे भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरणाचे (TRAI) अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांचे आवाहन
भारताच्या माध्यम परिसंस्थेच्या सक्षमीकरणासाठी सहकार्याधारित विकास, डिजिटल रेडियोचा प्रारंभ व सुलभ धोरणव्यवस्था आवश्यक असल्याचे त्यांनी केले अधोरेखित
Posted On:
08 OCT 2025 5:00PM by PIB Mumbai
मुंबई, 8 ऑक्टोबर 2025
भारताचे प्रसारण क्षेत्र व माध्यम उद्योग विकासाच्या पुढील टप्प्यावर जाण्यासाठी संतुलित नियम प्रणाली व नवोन्मेष आवश्यक असल्याचे प्रतिपादन भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरणाचे (TRAI) अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांनी केले.

मुंबई येथे झालेल्या फिक्की फ्रेम्स च्या 25 व्या कार्यक्रमात ते बोलत होते. भारताच्या माध्यम व मनोरंजन क्षेत्राने 2024 सालात देशाच्या अर्थव्यवस्थेत 2500अब्ज रुपयांचे योगदान दिले होते, येत्या 2027 सालात ते वाढून 3 हजार अब्ज रुपयांच्या पलीकडे जाण्याची शक्यता आहे. एकट्या दूरचित्रवाणी व प्रसारण क्षेत्राने गेल्या वर्षभरात 68 हजार कोटी रुपयांची कमाई केली होती.
अनालॉग पासून डिजिटल पर्यंत व आता 4k प्रसारणापर्यंत या क्षेत्राच्या प्रगतीला त्यांनी अधोरेखित केले. स्मार्ट टी व्ही , 5जी व 60कोटी प्रेक्षक असलेल्या ओटीटी मंचाच्या प्रगतीचेही यामध्ये योगदान आहे. डिजिटल मंचांमध्ये ही वाढ होऊनही 19 कोटी घरांपर्यंत पोचणारे दूरचित्रवाणीचे कार्यक्रम हेच अजूनही सर्वात महत्वाचे माध्यम आहे.
R9F4.jpeg)
ग्राहकांसाठी पारदर्शक व्यवहार व लहान व्यावसायिकांचे संरक्षण देण्यासोबतच नवोन्मेष व निकोप स्पर्धेच्या वातावरणात नियोजनबद्ध प्रगती साधणे हे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे उद्दिष्ट आहे असे लाहोटी यांनी सांगितले. केबल व दूरचित्रवाणी प्रसारण नियमावलीतील दुरुस्त्यांचा उल्लेख करताना त्यांनी दूरसंचार कायदा 2023 मधील प्रस्तावित परवानगी आधारित नियमांचा उल्लेख केला. या नुकत्याच करण्यात आलेल्या नियमांमधील सुधारणांमुळे व्यवसायसुलभता व नियमपालनाच्या प्रक्रियेचे सुलभीकरण झाल्याचे ते म्हणाले.
भारतातील प्रमुख शहरांमध्ये डिजिटल रेडियो प्रसारण प्रारंभ करून एफएम परिसंस्थेला पाठबळ देत भारताच्या श्राव्य माध्यमांचा विकास साधण्याची शिफारस प्राधिकरणाने केली असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्योगजगतातील भागधारकांसोबत काम करत आशय, प्रतिभा व संस्कृतीच्या मिलाफातून भगवी अर्थव्यवस्था उभी करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्राधिकरण वचनबद्ध असल्याचे नमूद करत त्यांनी आपले भाषण संपवले.
सुषमा काणे/उमा रायकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2176356)
Visitor Counter : 18