संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून पूरभागात मदत कार्य

प्रविष्टि तिथि: 30 SEP 2025 9:46PM by PIB Mumbai

पुणे, 30 सप्‍टेंबर 2025

 

जायकवाडी धरणातून काल 3.06 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर आणि मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर 30 सप्टेंबर 2025  रोजी  अभियंता कृतीदलसह छत्रपती संभाजी नगर येथील पूर मदत पथक  परभणी जिल्ह्यात तैनात करण्यात आले.

या पथकांनी पाथरी तालुक्यातील एका गर्भवती महिलेसह 34  नागरिकांची सुटका केली आणि तात्काळ वैद्यकीय मदत पुरवली.

बाधित नागरिकांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी नागरी प्रशासनाशी समन्वय साधून मदत कार्य हाती घेण्यात आले आहे. जिल्हा दंडाधिकारी आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून पाथरी येथे प्रशासकीय तळ स्थापन करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार मदत पुरवण्यासाठी बीड जिल्ह्यातील गेवराई येथे आणखी एक पथक तैनात आहे.

नैसर्गिक आपत्तींदरम्यान जीवितहानी टाळण्यासाठी आणि वेळेवर मदत पोहोचवण्यासाठी भारतीय लष्कर खंबीर आणि वचनबद्ध आहे.

   

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2173408) आगंतुक पटल : 37
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English