महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

“स्वस्थ्य नारी – सशक्त परिवार” मोहीम : सीजीएचएस नागपूरतर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन

प्रविष्टि तिथि: 27 SEP 2025 8:35PM by PIB Mumbai

नागपूर, 27 सप्टेंबर 2025

 

सीजीएचएस (केंद्र सरकार आरोग्य योजना) नागपूरच्या अतिरिक्त संचालक कार्यालयातर्फे “स्वस्थ्य नारी – सशक्त परिवार” या मोहिमेअंतर्गत विविध आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

ही मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 17 सप्टेंबर 2025 रोजी सुरू झाली असून, 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत देशभर आरोग्य शिबिरे व जनजागृती कार्यक्रमांद्वारे राबवली जात आहे. याचा उद्देश महिलांचे आरोग्य संवर्धन, कुटुंबाची मजबुती आणि प्रतिबंधात्मक तसेच प्राथमिक आरोग्यसेवेचा व्यापक प्रसार हा आहे.

नागपूर येथे सीजीएचएसने अॅनिमिया तपासणी, वैद्यकीय सल्लामसलत व सामान्य आरोग्यसेवा यावर लक्ष केंद्रित करणारी शिबिरे आयोजित केली आहेत. संतुलित आहारावरील विशेष जनजागृती कार्यक्रमही यावेळी घेण्यात आला.

18 ते 27 सप्टेंबर 2025 दरम्यान अॅनिमिया, कर्करोग  आणि स्त्रीरोग तपासणी, योग व आयुर्वेद सत्रे, अस्थीरोग, फुफ्फुसरोग, नेत्ररोग, दंतचिकित्सा, होमिओपॅथी या विषयांतील मल्टी-स्पेशालिटी सल्लामसलत, रक्तदान, माता व बाल आरोग्य सेवा, तसेच शाळा आणि समाजकेंद्रांमधील जनजागृती उपक्रम पार पडले.

डॉक्टर, तज्ञ, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांच्या उत्साही सहभागामुळे महिलांचे आरोग्य हे मजबूत आणि निरोगी कुटुंबाचे आधारस्तंभ असल्याचे अधोरेखित झाले आहे. 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत सीजीएचएस नागपूरतर्फे आणखी आरोग्य शिबिरे आणि जनजागृती मोहिमा सुरू राहतील.

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2172280) आगंतुक पटल : 62
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English