माहिती आणि प्रसारण मंत्रालय
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाची सह-निर्मिती -"तारा अँड आकाश: लव्ह बियॉन्ड रिअल्म्स्" जादुई प्रेमकथापट
प्रविष्टि तिथि:
27 SEP 2025 7:55PM by PIB Mumbai
मुंबई, 27 सप्टेंबर 2025
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), नवोदित चित्रपट निर्माते श्रीनिवास अबरोल दिग्दर्शित 'तारा अँड आकाश: लव्ह बियॉन्ड रिअल्म्स' या इंडो-स्विस चित्रपटासाठी सह-निर्मिती अभिमानाने जाहीर करत आहे.
इटर्निटी फिल्म्स आणि स्वित्झर्लंड टुरिझमच्या व्हिस्पर्स यांच्या सहयोगातून तयार करण्यात आलेला हा चित्रपट म्हणजे प्रेम आणि वास्तववादाचे अनोखे मिश्रण आहे. तारा नावाच्या एका तरुणीच्या असाधारण प्रवासाचे वर्णन या चित्रपटात केले आहे, जी स्वित्झर्लंडला एकटीच फिरायला गेली असताना (सोलो ट्रिप) आकाशला भेटते, जो एका वेगळ्याच रहस्यमय दुनियेतील प्रकाशमय व्यक्ती आहे. त्यांची नियेजित भेट स्वित्झर्लंडच्या चित्तवेधक प्रदेशात होते आणि त्यानंतर प्रेम, नशिब आणि पारलौकिक जग अशा विविध छटा या सिनेमाची कथा उलगडत जातात.
प्रतिष्ठित फिल्म बाजार 2023 - व्ह्यूइंग रूम आणि डेब्यू डायरेक्टर को-प्रॉडक्शन प्रोग्राम अंतर्गत निवड झालेल्या तारा आणि आकाश यांनी एव्हाना जगभरातील सिनेप्रेमींचे लक्ष वेधले आहे. हा चित्रपट टोरँटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (TIFF) आणि गोव्यातल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला होता आणि अद्वितीय कथाकथन आणि दृश्यात्मक प्रतिभेसाठी त्याला नावाजले गेले.
या चित्रपटात जितेश ठाकूर (आकाश), अलंकृता बोरा (तारा), प्रसिद्ध अभिनेते अमोल पालेकर, दीप्ती नवल आणि ब्रिजेंद्र काला प्रमुख भूमिकेत आहेत. अतीत सिंग यांच्या छायाचित्रणामुळे स्वित्झर्लंडचे अलौकिक सौंदर्य पाहायला मिळते.
या प्रकल्पाबद्दल बोलताना, दिग्दर्शक श्रीनिवास अबरोल म्हणाले:
"तारा आणि आकाश ही केवळ एक प्रेमकथा नाही, तर भौतिक जगाच्या पलीकडे असलेल्या प्रेमाच्या अनंत रूपांचा आणि आत्म-शोधाचा प्रवास आहे. आम्हाला जादुई वास्तववादाच्या माध्यमातून असा चित्रपट तयार करायचा होता, जो वैश्विक मानवी संबंधांमधून प्रेरणा देतो."
नवोदित दिग्दर्शकांना पाठिंबा देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सहयोगांना प्रोत्साहन देण्यासाठी एनएफडीसीच्या पुढाकाराने सह-निर्मित असा हा चित्रपट भारत-स्विस सिनेमॅटिक हितसंबंधांमध्ये मैलाचा दगड ठरला आहे.
एनएफडीसी या प्रकल्पाद्वारे नवीन प्रतिभेचे संगोपन करण्याचे, जागतिक भागीदारी वृध्दिंगत करण्याचे आणि भारतीय कथा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर नेण्याचे उद्दिष्ट पुढे नेत आहे.
* * *
पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/पर्णिका हेदवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2172255)
आगंतुक पटल : 26
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English