नौवहन मंत्रालय
"आपला महासागर, आपले दायित्व, आपली संधी" या संकल्पनेसह जागतिक सागरी दिन 2025 साजरा
प्रविष्टि तिथि:
26 SEP 2025 6:32PM by PIB Mumbai
बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या जहाजबांधणी महासंचालनालया अंतर्गत, राष्ट्रीय सागरी दिन महोत्सव (केंद्रीय) समितीने आयोजित केलेला जागतिक सागरी दिन 2025, आज यशस्वीपणे साजरा झाला. "आपले महासागर, आपले दायित्व, आपली संधी" ही या दिवसाची संकल्पना होती.

राष्ट्रीय नौवहन मंडळाचे अध्यक्ष, समीर कुमार खरे, आयएएस (सेवानिवृत्त), या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नौवहन विभागाचे अतिरिक्त महासंचालक सुशील मानसिंग खोपडे, आयपीएस, आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कार्मिक आणि प्रशासन विभागाचे अधिकारी कॅप्टन सोम राज, आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. या मान्यवरांनी आपल्या भाषणात जागतिक व्यापारामधील नाविकांची महत्त्वाची भूमिका आणि शाश्वत सागरी पद्धतींचे महत्त्व अधोरेखित केले.
बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांचा व्हिडिओ संदेश तसेच आंतरराष्ट्रीय सागरी वाहतूक संस्थेचे सरचिटणीस आर्सेनियो डोमिंग्वेझ यांच्या विचारांनी या महोत्सवाला जागतिक दृष्टीकोन दिला.

अश मोहम्मद, डीडीजी; डॉ. संजय भवनानी संचालक आणि सीओओ, एमएमएस मेरीटाईम (इंडिया) प्रा. लि., गोपीकृष्ण सी., अभियंता आणि जहाज सर्वेक्षक; आणि डॉ. सुधीर एस. कोहाकडे, उपमहासंचालक, यांनी यावेळी सागरी सुरक्षा, शाश्वतता आणि आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत राहण्यासाठी डीजी शिपिंगने हाती घेतलेले उपक्रम प्रदर्शित करणारे माहितीपूर्ण सादरीकरण केले.

भारतीय नौवाहन महामंडळ सागरी प्रशिक्षण संस्थेच्या छात्रांनी त्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणाने कार्यक्रमामध्ये चैतन्य आणले. हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल समितीने सर्व अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक, प्रसारमाध्यमे आणि नाविकांचे मनःपूर्वक आभार मानले. या महोत्सवाने 2025 च्या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित केले. ही संकल्पना येणाऱ्या पिढ्यांसाठी सुरक्षित, समावेशक आणि शाश्वत महासागरांप्रति सामूहिक जबाबदारीची जाणीव करून देते.
***
निलिमा चितळे / राजश्री आगाशे / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2172004)
आगंतुक पटल : 45
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English