आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत 'सीजीएचएस' पुणे मार्फत ‘सामुहिक श्रमदान’

Posted On: 26 SEP 2025 5:09PM by PIB Mumbai

 

पुणे, 26 सप्टेंबर 2025

सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्किम अर्थात CGHS पुणे च्या मुकुंद नगर मुख्यालयामार्फत आज ‘सामुहिक श्रमदान’ (सामुदायिक स्वच्छता मोहीम) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेचा भाग म्हणून मुकुंद नगर रस्त्यावरील अतिरिक्त संचालक कार्यालयाजवळ हा एक दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या उपक्रमाचा भाग म्हणून, सीजीएचएस कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत स्वच्छतेप्रती दृढ वचनबद्धता दर्शवून एक तास स्वयंस्फूर्तीने स्वच्छता कार्य केले.

याप्रसंगी, सीजीएचएसचे अतिरिक्त संचालक डॉ. चंद्र प्रकाश चौधरी, डॉ. संजीव केंद्रे, डॉ. अनुराधा सोंडूर, नोडल अधिकारी डॉ. रूपेश विलास पाटील आणि इतर अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

श्रमदानादरम्यान, सुमारे मुकुंदनगर येथील तब्बल 300 मीटर परिसर स्वच्छ करण्यात आला, ज्यामुळे परिसरातील स्वच्छतेत लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून आले.

या कार्यक्रमाने केवळ स्वच्छतेचे महत्त्व आणि जागरूकताच वाढवली नाही, सामूहिक प्रयत्नांमधील ताकद आणि सामाजिक जबाबदारीची भावना देखील अधोरेखित केली.

***

हर्षल अकुडे / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2171772) अभ्यागत कक्ष : 16
Read this releasein: English