महिला आणि बालविकास मंत्रालय
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे आरोग्याची वारी उपक्रम
Posted On:
25 SEP 2025 5:04PM by PIB Mumbai
वर्धा, 25 सप्टेंबर 2025
महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडीकल सायन्स, सेवाग्राम तर्फे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे आरोग्याची वारी या कार्यक्रमांतर्गत महिलांच्या सर्व प्रकारच्या आरोग्य तपासणी व समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी डॉक्टर बी एस गर्ग, सचिव महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था सेवाग्राम, प्राध्यापिका डॉ. चेतना मलीये, प्राध्यापक डॉक्टर अभिषेक राऊत, सेवाग्राम येथील सरपंच व अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
AXWF.jpeg)
यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत मान्यवरांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.त्यानंतर महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी लावलेल्या विविध स्टॉल्सवर तपासणीला सुरुवात झाली.
ज्यामध्ये महिलांचे असंसर्गजन्य आजार जसे बीपी, शुगर,BMI, थायरॉईड,मानसिक स्वास्थ इत्यादी बाबत तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले.

कॅन्सर बाबत जनजागृती करण्यात आली. विशेषतः महिलांचे ब्रेस्ट कॅन्सर व सर्वाइकल कॅन्सर याविषयी पोस्टर्स द्वारे माहिती दिली. महिलांना स्तणांच्या कॅन्सरची तपासणी स्वतः कशी करावी, याबद्दल प्रशिक्षण दिले.
महिलांनी स्वतःवरचा मानसिक तणाव कमी करण्यासाठी थॉट इमोशन आणि बिहेवियर ही सायकल ब्रेक करण्यासाठी महिलांनी स्वतःच्या कुठल्या गोष्टी करू शकतात, जसे की आपली आवडती मालिका बघणे आवडते व्हिडिओ बघणे इत्यादी उदाहरणांद्वारे महिलांना मानसिक आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यात आले, त्यासाठी विविध खेळ त्यांच्याकडून करून घेण्यात आले.
महिलांनी आपल्या आहारात संतुलित आहार कसा घ्यावा याबाबत खेळाद्वारे माहिती दिली. आपल्या आहारात कार्बोहायड्रेट्स आणि फॅट युक्त आहार कमी करून फायबर युक्त विटामिन्स युक्त आहाराचा समावेश कसा करावा याबाबत विविध खेळ घेण्यात आले.
9DSA.jpeg)
यासोबतच तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनाधीनतेबाबत जनजागृती पर माहिती त्यांना चार्टच्या माध्यमातून देण्यात आली. सेवाग्राम परिसरातील महिलांनी या शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद दिला.
* * *
पीआयबी मुंबई | हंसराज राऊत/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2171221)
अभ्यागत कक्ष : 16