रेल्वे मंत्रालय
बिहारमधील बख्तियारपूर-राजगीर-तिलैया एकेरी रेल्वे मार्गाच्या (104 किमी) 2,192 कोटी रुपये खर्चाच्या दुपदरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता
प्रविष्टि तिथि:
24 SEP 2025 8:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहारांवरील मंत्रिमंडळ समितीने बिहारमधील बख्तियारपूर-राजगीर-तिलैया एकेरी रेल्वे मार्गाच्या (104 किमी) दुपदरीकरणाला मान्यता दिली आहे, ज्याचा एकूण खर्च सुमारे 2,192 कोटी रुपये आहे.
बिहार राज्यातील चार जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या प्रकल्पामुळे भारतीय रेल्वेचे विद्यमान जाळे सुमारे 104 किमीने वाढेल.
प्रकल्पाचा हा भाग राजगीर (शांती स्तूप), नालंदा, पावापुरी इत्यादी प्रमुख स्थळांना रेल्वे संपर्क देखील प्रदान करतो, ज्यामुळे देशभरातील यात्रेकरू आणि पर्यटक या स्थानांकडे आकर्षित होतील.
बहु पदरीकरण प्रकल्पांमुळे सुमारे 1,434 गावांना आणि सुमारे 13.46 लाख लोक तसेच दोन आकांक्षी जिल्हे (गया आणि नवादा) या दोन आकांक्षी जिल्ह्यांना संपर्क सुविधा उपलब्ध होणार आहे.
कोळसा, सिमेंट, क्लिंकर, फ्लाय ॲश इत्यादी वस्तूंच्या वाहतुकीसाठी हा एक आवश्यक मार्ग आहे. क्षमता वाढीच्या कामांमुळे 26 एमटीपीए (प्रतिवर्षी दशलक्ष टन) अतिरिक्त मालवाहतूक होईल. रेल्वेसेवा ही पर्यावरणपूरक आणि ऊर्जा कार्यक्षम वाहतुकीचा मार्ग असल्याने, हवामान उद्दिष्टे साध्य करण्यात आणि देशाचा लॉजिस्टिक्स खर्च कमी करण्यात मदत होईल. यामुळे तेल आयात (5 कोटी लिटर) कमी होईल आणि कार्बन उत्सर्जन (24 कोटी किलो) कमी होईल जे 1 कोटी झाडे लावण्यासमान आहे.
या वाढीव मार्गामुळे गतिशीलता सुधारेल, भारतीय रेल्वेला वाढीव कार्यक्षमता आणि सेवा विश्वासार्हता प्राप्त होईल. मल्टी-ट्रॅकिंग प्रस्तावामुळे कामकाज सुलभ होईल आणि गर्दी कमी होईल, ज्यामुळे भारतीय रेल्वेमधील सर्वात व्यस्त विभागात आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास होईल. हे प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असून यामुळे या भागातील लोकांना व्यापक विकासाद्वारे "आत्मनिर्भर" बनवता येईल तसेच त्यांच्या रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील.
हे प्रकल्प प्रधानमंत्री-गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनवर आधारित आहेत. या प्रकल्पात एकात्मिक नियोजन आणि भागधारकांच्या सल्ल्याद्वारे बहु-पद्धतीय आणि लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. हे प्रकल्प प्रवासी, माल आणि सेवांच्या वाहतुकीसाठी अखंड संपर्क प्रदान करतील.
* * *
निलिमा चितळे/श्रध्दा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2170911)
आगंतुक पटल : 7