संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी महाराष्ट्राचे क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री माणिकराव कोकाटे यांची मुंबईमध्ये भेट घेतली


महाराष्ट्रातील युवकांच्या सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे मंत्र्यांनी दिले आश्वासन

प्रविष्टि तिथि: 24 SEP 2025 4:45PM by PIB Mumbai

मुंबई, 24 सप्‍टेंबर 2025

 

महाराष्ट्र एनसीसी (राष्ट्रीय छात्र सेना) संचालनालयाच्या अतिरिक्त महासंचालकपदी अलिकडेच नियुक्ती झाल्यानंतर मेजर जनरल विवेक त्यागी यांनी मुंबई मध्ये मंत्रालयात महाराष्ट्राचे क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांची सदिच्छा भेट घेतली. या बैठकीला क्रीडा मंत्रालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांच्यासह मंत्रालयाचे इतर प्रमुख अधिकारी देखील उपस्थित होते.देशाच्या ‘विकसित भारत @ 2047’, या दृष्टिकोनाचा प्रमुख घटक असलेल्या, युवा सक्षमीकरणासाठी एनसीसी महाराष्ट्र संचालनालयाला दिलेल्या सक्रिय सहकार्याबद्दल अतिरिक्त महासंचालक त्यागी यांनी मंत्र्यांचे आभार मानले.देशभरातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या उपक्रमांमध्ये महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचे विशेष स्थान असल्याचे एडीजी त्यागी यांनी अधोरेखित केले, ज्यामध्ये प्रतिष्ठित आंतर संचालनालय अजिंक्यपद स्पर्धा  विक्रमी 23 वेळा जिंकण्याचा समावेश आहे.

राज्यातील छात्रांची संख्या मुलींच्या मोठ्या प्रतिनिधित्वासह 1,21,878 पर्यंत वाढवण्यासाठी एनसीसीचा विस्तार केला जात आहे, त्यासाठी महाराष्ट्रातील अधिकाधिक महाविद्यालये आणि शाळांपर्यंत एनसीसीची पोहोच वाढविण्यात येत आहे. यासारख्या एनसीसीच्या सध्या सुरु असलेल्या महत्त्वाच्या उपक्रमांची माहिती एडीजी त्यागी यांनी मंत्र्यांना दिली. संचालनालयाच्या 63 त्रि-सेवा युनिटमधील राज्य एनसीसी कॅडेट्सच्या अलिकडच्या कामगिरीवरही त्यांनी प्रकाश टाकला.

एनसीसीच्या विविध उपक्रमांना पाठबळ देण्यासाठी प्रशिक्षण, कर्मचारी आणि पायाभूत सुविधांची गरज आणि एनसीसीच्या सुधारित अभ्यासक्रमाला अनुसरून दिल्या जाणाऱ्या भविष्यवेधी प्रशिक्षणाच्या पार्श्वभूमीवर, एडीजी त्यागी यांनी मंत्र्यांना संचालनालयाच्या पायाभूत सुविधा आणि कर्मचाऱ्यांच्या गरजा तातडीने पूर्ण करण्याची विनंती केली. मंत्र्यांनी अतिरिक्त महासंचालकांना दोन्ही मुद्द्यांवर त्वरित कृती केली जाईल, असे आश्वासन दिले आणि मुंबई क्षेत्रातील एनसीसीला पुरेशी मालमत्ता आणि समर्पित क्षेत्रांचे वाटप करून लवकरात लवकर पुढील कार्यवाही  करण्याचे  निर्देश  आपल्या कर्मचाऱ्यांना दिले. एनसीसी युनिटच्या विस्तारासाठी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याचे आणि अतिरिक्त रिक्त पदे अधिकृत करण्याचे निर्देशही मंत्र्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिले.

  

स्मृतिचिन्हांच्या देवाणघेवाणीने बैठकीचा समारोप झाला. एनसीसीच्या महत्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मंत्र्यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल अतिरिक्त महासंचालकांनी त्यांचे  मनापासून आभार मानले.

एडीजी त्यागी यांनी मंत्र्यांना आश्वासन दिले की महाराष्ट्र सरकार आणि त्यांच्या मंत्रालयाच्या सातत्यपूर्ण आणि सक्रिय पाठबळावर, राज्यातल्या युवकांमध्ये राष्ट्र सर्वप्रथम हे मूल्य बिंबवून त्यांना  जबाबदार नागरिक आणि देशभक्त भारतीय बनून यशस्वी कारकीर्द घडवण्यासाठी प्रभावीपणे सक्षम बनवले जाईल.

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2170701) आगंतुक पटल : 83
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English