संरक्षण मंत्रालय
दक्षिणी लष्कर कमांडरांनी केली ग्वाल्हेरच्या एनसीसी अधिकारी प्रशिक्षण अकादमीतील हीरक महोत्सवी दीक्षांत संचलनाची पाहणी
Posted On:
19 SEP 2025 7:05PM by PIB Mumbai
पुणे, 19 सप्टेंबर 2025
दक्षिण कमांड चे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, पीव्हीएसएम, एवीएसएम, यांनी एनसीसी अधिकारी प्रशिक्षण अकादमी, ग्वाल्हेर इथं ऐतिहासिक हीरक महोत्सवी दीक्षांत संचलनाची पाहणी केली. या संचलनात 131 महिला सहयोगी एनसीसी अधिकाऱ्यांनी (एएनओ) आपले खडतर प्रशिक्षण पूर्ण करून अभिमानाने शपथ घेतली. या महत्त्वाच्या प्रसंगातून सहा दशकांपासून भविष्यातील नेते घडवण्याच्या कामगिरीचा गौरव तर साजरा झालाच त्याबरोबरच देशाच्या संरक्षण आणि सामाजिक जडणघडणीत ‘महिला शक्ती’च्या वाढत्या सामर्थ्याचे दर्शन घडले.


लष्कराच्या कमांडरनी एनसीसी अधिकाऱ्यांची शिस्त आणि चिवट वृत्तीचे कौतुक केले, आणि समाजात तसेच सशस्त्र दलांमध्ये महिलांची वाढती भूमिका अधोरेखित केली. त्यांनी राष्ट्रनिर्माणात 'महिला शक्ती'चे महत्त्वही सांगितले.
RKK2.jpeg)

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी एएनओजना प्रशिक्षक म्हणून आपली महत्त्वाची भूमिका स्वीकारण्याचे आवाहन आपल्या प्रेरणादायी भाषणात,केले. एनसीसी कॅडेट्सना जबाबदार नागरिक, तत्त्वनिष्ठ नेते आणि भावी 'नागरिक-योद्धा' म्हणून प्रभावीपणे घडवावे. 'एकता आणि शिस्त' या एनसीसीच्या ब्रीदवाक्याप्रमाणेच देशातील तरुणांना चारित्र्य, धैर्य आणि सचोटीचे महत्त्व पटवून देण्यामध्ये एनसीसीचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

त्यांनी नव्याने नियुक्त झालेल्या एएनओजना त्यांच्या प्रशिक्षणाचा उपयोग करून, पुढील पिढीला मार्गदर्शन करण्यास आणि 'विकसित भारत @ 2047' च्या दृष्टिकोनात सक्रीयपणे योगदान देण्यासाठी प्रोत्साहित केले.
निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2168685)
अभ्यागत कक्ष : 19