संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सज्जतेत वाढ आणि संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भर भारताला नवा आयाम

Posted On: 18 SEP 2025 5:44PM by PIB Mumbai

पुणे, 18 सप्टेंबर 2025

संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भर भारत आणि कार्यात्मक सज्जतेत वाढ करणे आणि संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरतेच्या राष्ट्रीय दृष्टीकोनाला बळकटी देण्याचे ध्येय पूर्ण करण्याच्या उद्देशाने  लष्करी तळाच्या 512 कार्यशाळेने प्रोजेक्ट लोटस अंतर्गत (ARV) VT-72B च्या चिलखती पुनर्प्राप्ती वाहनाच्या पहिल्या प्रायगिक तत्वावरील दुरुस्तीचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. हा संरक्षण क्षेत्रातला एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या वाहनाचा कार्यारंभ समारंभ संपूर्ण लष्करी इतमामात पार पडला. या समारंभाला परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेवा पदक प्राप्त तसेच देखभाल आणि पुरवठा महासंचालक लेफ्टनंट जनरल अमरदीप सिंह औजला उपस्थितीत होते. त्यांनी दुरुस्त केलेल्या ARV ला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी अति विशिष्ट सेवा पदक प्राप्त महासंचालक तसेच विद्युत यांत्रिकी दलाचे वरिष्ठ कर्नल कमांडंट, विद्युत यांत्रिकी दलाचे लेफ्टनंट जनरल जे. एस. सिदाना, आणि विशिष्ट सेवा पदक प्राप्त लष्करी तळ कार्यशाळा गटाचे कमांडर मेजर जनरल ललित कपूर हे देखील उपस्थित होते.

ARV VT-72B बद्दलची माहिती

चिलखती पुनर्प्राप्ती वाहन VT-72B हे एक अत्यावश्यक साधन आहे. रणगाडे आणि चिलखती लढाऊ वाहनांची दुरुस्त करण्यासाठी आणि युद्धभूमीवर त्यांना आवश्यक सहाय्य पुरवण्यासाठी याचा वापर केला जातो. T-72B या यशस्वी ठरलेल्या व्यवस्थेद्वारे हे वाहन विकसित केले गेले आहे. विविधांगी भूप्रदेश आणि विभिन्न कार्यात्मक परिस्थितींमध्ये आघाडीच्या रणगाड्यांना लढण्यासाठी सज्ज ठेवण्यात ARV VT-72B महत्त्वाची भूमिका पार पाडत आले आहे.

अशा अनेक वाहनांनी अनेक दशकांची सेवा पूर्ण केली आहे त्यामुळे त्यांचे कार्यात्मक आयुष्यमान वाढवण्यासाठी आणि त्यांची लढाऊ सहाय्य करण्याची क्षमता टिकवून ठेवण्यासाठी त्यांची सुयोग्य दुरुस्ती करण्याची आवश्यकता होती.

पुण्यातील लष्करी तळाच्या 512 कार्यशाळेत या दुरुस्त केलेल्या ARV VT-72B चा औपचारिक कार्यारंभ करण्यात आला. यावेळी परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेवा पदक प्राप्त तसेच देखभाल आणि पुरवठा महासंचालक लेफ्टनंट जनरल अमरदीप सिंह औजला यांनी वाहनाची पाहणी केली. तसेच, त्यांनी या प्रकल्पाची जबाबदारी सांभाळत असलेल्या अधिकारी आणि तंत्रज्ञांच्या चमूशीही संवाद साधला आणि त्यांच्या व्यावसायिक तज्ञतेची आणि समर्पणाची प्रशंसाही केली.

यावेळी लेफ्टनंट जनरल ए. एस. औजला यांनी उपस्थितांना संबोधितही केले. आपल्या भाषणातून त्यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रोजेक्ट लोटस अंतर्गत ARV VT-72B ची यशस्वीपणे केलेल्या दुरुस्ती हे स्वदेशी प्रयत्न, तांत्रिक कौशल्य आणि समर्पणातून आपल्याला काहीही साध्य करता येते याचे एक उत्कृष्ट उदाहरण असल्याचे ते म्हणाले. यातून विद्युत यांत्रिकी दलाच्या वचनबद्धतेसोबतच, संरक्षण क्षेत्रातच्या बाबतीत आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी योगदान देण्याच्या भारतीय लष्कराचा अतूट संकल्पाचाही प्रचिती आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अति विशिष्ट सेवा पदक प्राप्त महासंचालक तसेच विद्युत यांत्रिकी दलाचे वरिष्ठ कर्नल कमांडंट, विद्युत यांत्रिकी दलाचे लेफ्टनंट जनरल जे. एस. सिदाना यांनीही या कामगिरीचे कौतुक केले. विद्युत यांत्रिकी दलाने नेहमीच आपली आघाडीची लढाऊ प्रणाली सदैव मोहिमेसाठी सज्ज राहील याची सुनिश्चिती केली असल्याचे ते म्हणाले. आज ARV VT-72B च्या कार्यारंभातून आपली ही क्षमता टिकवून ठेवण्याच्या दिशेने एका नवीन टप्प्याची सुरुवात आली असून, याद्वारे आपण आपल्या स्वतःच्या क्षमतांचा वापर करून जुन्या व्यवस्थांना पुनरुज्जीवीत करत असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली.


जयदेवी पुजारी-स्वामी/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2168158)
Read this release in: English