भूविज्ञान मंत्रालय
स्वच्छ सागर, सुरक्षित सागर अभियानाअंतर्गत मिरामार समुद्र तटावर किनारपट्टी स्वच्छता मोहीम आयोजित
प्रविष्टि तिथि:
17 SEP 2025 10:18PM by PIB Mumbai
गोवा, 17 सप्टेंबर 2025
गोवा येथील सीएसआयआर- राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने (एनआयओ) ने आज, 17 सप्टेंबर 2025 रोजी पणजीतील मिरामार समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छ सागर सुरक्षित सागर अभियानाअंतर्गत किनारपट्टी स्वच्छता मोहीम आयोजित केली होती.
भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय किनारी संशोधन केंद्र (एन सी सी आर) यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम 2025 च्या आंतरराष्ट्रीय किनारी स्वच्छता दिनापूर्वी आयोजित करण्यात आला होता. मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी एन आय ओ आणि एन सी सी आर चे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह या मोहिमेचे नेतृत्व केले.

रविचंद्रन म्हणाले की, 20 सप्टेंबर रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय किनारी स्वच्छता दिनानिमित्त आयोजित समुद्रतट स्वच्छता सप्ताहात एम ओ ई एस आणि इतर संबंधित विभाग विविध उपक्रम राबवत आहेत. “हे केवळ समुद्रकिनारे स्वच्छ करण्याबद्दल नाही तर ते आपले महासागर स्वच्छ ठेवण्याच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करण्याबद्दल आहे कारण महासागर आपल्यासाठी महत्वाचे आहेत."आपण सर्वांना माहीत आहे की महासागर अनेक संधी प्रदान करतात. परंतु हवामानविषयक आणि बिगर हवामानविषयक आव्हानांसारख्या अनेक आव्हानांना महासागरांना तोंड द्यावे लागते. महासागर आणि परिसंस्था स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी आपण लहानलहान उपक्रम राबविणे अत्यंत आवश्यक आहे," असे ते म्हणाले.
एमओईएसचे शास्त्रज्ञ जी आणि सल्लागार डॉ. विजय कुमार यांनीही उपस्थितांना संबोधित केले. सीएसआयआर-एनआयओचे संचालक प्रो. सुनील कुमार सिंग यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर सीएसआयआर-एनआयओचे वरिष्ठ प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. दामोदर एम. शेणॉय यांनी आभार मानले.

या कार्यक्रमात नागरिक, विद्यार्थी समुदाय, स्वयंसेवी संस्था आणि सामुदायिक गटांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. गोळा केलेला कचरा वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागण्यात आला आणि नंतर तो पणजी शहराच्या महानगरपालिकेकडे देण्यात आला.
स्वच्छ सागर, सुरक्षित सागर अभियानाद्वारे, पृथ्वी विज्ञान मंत्रालय देशभरातील किनारपट्टी स्वच्छता मोहिमांना चालना देते, ज्यामध्ये प्लास्टिक, धातू, कापड, रबर, कागद आणि लाकडाचा कचरा यासह अनेक टन कचरा काढून टाकला जातो. हे अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्पिलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत भारत सरकारच्या स्वच्छता ही सेवा या विद्यमान उपक्रमाशी सुसंगत आहे.

2022 मध्ये सुरू करण्यात आलेले स्वच्छ सागर, सुरक्षित सागर अभियान हा एमओईएसचा एक प्रमुख उपक्रम आहे ज्याचा उद्देश सागरी प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणे, किनारी क्षेत्रांचे संवर्धन करणे आणि महासागरांचे संरक्षण करण्यासाठी तसेच सागरी परिसंस्थांचे जतन करण्यासाठी स्वच्छता आणि शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देणे हा आहे. हे आंतरराष्ट्रीय किनारी स्वच्छता दिनाचे देखील प्रतीक आहे. ही मोहीम म्हणजे सागरी कचऱ्याचा किनारी जैवविविधतेवर होणारा परिणाम कमी करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. ही मोहीम सर्व वयोगटातील नागरिकांना सहभागी करून समुदायाला पर्यावरणपूरक सवयी स्वीकारण्यास तसेच सागरी संवर्धनाचे समर्थक बनण्यास प्रेरित करते.
* * *
पीआयबी पणजी | निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2167881)
आगंतुक पटल : 28
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English