नौवहन मंत्रालय
मुरगांव बंदर प्राधिकरणाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या शाळांकरता प्राधिकरणाकडून शिक्षक दिन सोहळ्याचे आयोजन
या कार्यक्रमाला गोवा विद्यापीठाचे कुलगुरू यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती
शिक्षकांचे अतूट समर्पण आणि अमूल्य योगदानाचा केला गौरव
Posted On:
17 SEP 2025 7:46PM by PIB Mumbai
गोवा, 17 सप्टेंबर 2025
मुरगांव बंदर प्राधिकरण शिक्षण संस्थेने दीपविहार प्राथमिक शाळा, दीपविहार माध्यमिक शाळा, दीपविहार उच्च माध्यमिक शाळा, आणि द न्यू डॉन आशादीप स्पेशल स्कूल या आपल्या सर्व शाळांमधील शिक्षकांच्या अतूट समर्पण आणि अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी शिक्षक दिन सोहळा आणि सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
4561.jpeg)
या कार्यक्रमाला गोवा विद्यापीठाचे कुलगुरू, प्रा. डॉ. हरिलाल बी. मेनन हे प्रमुख पाहुणे म्हणून, तर मुरगांव बंदर प्राधिकरणाचे (एमपीए) अध्यक्ष डॉ. एन. विनोदकुमार आणि उपाध्यक्ष विनायक राव हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. मुरगांव बंदर प्राधिकरणाचे मुख्य अभियंता असलेले आणि मुरगांव बंदर प्राधिकरण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुदन्वा फडते यांच्या स्वागतपर भाषणाने या कार्यक्रमाची औपचारीक सुरुवात झाली. यानिमित्ताने मुरगांव बंदर प्राधिकरण शिक्षण संस्थेअंतर्गतच्या सर्व शाळांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे आणि शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्टतेप्रति संस्थेच्या वचनबद्धतेची प्रचिती देणारे एक प्रभावी सादरीकरणही करण्यात आले.

या कार्यक्रमात झालेल्या भावपूर्ण सत्कार सोहळ्यात, प्रा. डॉ. मेनन यांच्या हस्ते शिक्षकांना त्यांचे अथक प्रयत्न, त्यांची समर्पण वृत्ती आणि त्यांनी अनेक पिढीतील विद्यार्थ्यांवर टाकलेल्या प्रभावासाठी गौरवचिन्हे देऊन सन्मानित केले गेले. हा कार्यक्रम समाजाचे आधारस्तंभ आणि प्रेरणास्थान म्हणून काम करत असलेल्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव सोहळाच ठरला.
यावेळी प्रा. डॉ. मेनन यांनी उपस्थितांना संबोधित केले. शिक्षणामुळे होणारे परिवर्तन आणि समाजाच्या जडणघडणीत शिक्षक बजावत असलेली महत्त्वाची भूमिका त्यांनी अधोरेखित केली. मुरगांव बंदर प्राधिकरण शिक्षण संस्थेचे सरचिटणीस फ्रेडी सोरेस यांनी कार्यक्रमाच्या समारोपात उपस्थित सर्व मान्यवर आणि योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले.
या कार्यक्रमाला मुरगांव बंदर प्राधिकरणाच्या विभाग प्रमुखांसह वरिष्ठ अधिकारी आणि संस्थेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या सर्व शाळांचे शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.
K99P.jpeg)
मुरगांव बंदर प्राधिकरण शिक्षण संस्थेविषयी:
1860 च्या सोसायटी नोंदणी कायद्यांतर्गत 1982 मध्ये मुरगांव बंदर प्राधिकरण शिक्षण संस्था या संस्थेची स्थापना झाली होती. तेव्हापासूनच ही संस्था या भागातील शैक्षणिक विकासाचा आधारस्तंभ बनली आहे. आपल्या आजवरच्या वाटचालीत संस्थेने नर्सरी ते उच्च माध्यमिकपर्यंतचा टप्पा गाठला आहे. या संस्थेच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या शाळांमधून बंदर प्राधिकरणाअंतर्गत काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना तसेच वास्कोमध्ये वसलेल्या मोठ्या समाजाला शैक्षणिक सेवा सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. मुरगांव बंदर प्राधिकरण शिक्षण संस्थेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्ये सुदन्वा फडते अध्यक्ष म्हणून, फ्रेडी सोरेस सरचिटणीस म्हणून, आणि मिलिंद देसाई खजिनदार म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
* * *
(Source: MPA, Goa) | पीआयबी पणजी | निलिमा चितळे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 2167777)
अभ्यागत कक्ष : 21