अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

अणुऊर्जा विभागाने विशेष मोहीम 4.0 अंतर्गत गाठला मोठा टप्पा; चैतन्य आणि उत्साहाने विशेष मोहीम 5.0 साठी सज्ज

Posted On: 17 SEP 2025 4:15PM by PIB Mumbai

मुंबई, 17 सप्‍टेंबर 2025

 

अणुऊर्जा विभागाने डिसेंबर 2024 पासून सुरू झालेल्या मोहिमेच्या अनुषंगाने विशेष मोहीम 4.0 चे चैतन्य कायम ठेवले आहे. विभागाचे सर्व घटक युनिट, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम तसेच अनुदानित संस्था या विशेष मोहिमेच्या अनुषंगाने काम करत आहेत.

विशेष मोहीम 4.0 (डिसेंबर 2024 - ऑगस्ट 2025) च्या पुढील भागात डीएईने 115 स्वच्छता मोहिमा राबवल्या, 80,930 फायलींचे पुनरावलोकन केले आणि 63,716 फायलींचा निपटारा केला. अणुऊर्जा विभागाने या कालावधीत 1,600 सार्वजनिक तक्रारी आणि 151 सार्वजनिक तक्रार अपिलांचे  निवारण केले. भंगाराची विल्हेवाट  लावल्यामुळे 10 कोटींपेक्षा जास्त महसूल निर्माण झाला असून सुमारे 7,011 चौरस फूट कार्यालयीन जागा मोकळी करण्यात आली आहे.

अणुऊर्जा विभाग  आता विशेष मोहीम 5.0 साठी सज्ज होत आहे. विभागाने आपल्या सर्व युनिट्सना, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना आणि अनुदानित संस्थांना विशेष मोहीम 5.0 मध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचे, समाजमाध्यमांद्वारे मोहिमेची व्यापक प्रसिद्धी करण्याचे आणि सर्वोत्तम पद्धतींबाबत नाविन्यपूर्ण कल्पना स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत.

15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत होणाऱ्या मोहिमेच्या तयारी टप्प्यासाठी, विभागाने आपल्या घटक युनिट्सना, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना तसेच अनुदानित संस्थांना 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत अंमलबजावणी टप्प्यासाठी  लक्ष्ये निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष मोहीम 5.0 मोठ्या प्रमाणात यशस्वी व्हावी, यासाठी विभाग कठोर परिश्रम करेल.

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2167604) अभ्यागत कक्ष : 19
Read this releasein: English