वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
सरकारने ‘व्हाईट गुड्स’ अर्थात घरगुती विद्युत उपकरणे (एसी आणि एलईडी लाईट्स) साठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेच्या अर्जासाठीची खिडकी 15 सप्टेंबर 2025 पासून 30 दिवसांसाठी पुन्हा सुरू केली
Posted On:
14 SEP 2025 11:33AM by PIB Mumbai
‘व्हाईट गुड्स’ अर्थात घरगुती विद्युत उपकरणे (वातानुकूलन यंत्र - एसी आणि एलईडी लाईट) साठीच्या पीएलआय योजनेत उद्योगाच्या वाढत्या गुंतवणुकीच्या इच्छेनुसार अर्ज सादर करण्यासाठीची खिडकी पुन्हा सुरू करण्यात येत आहे. पीएलआयडब्ल्यूजी योजनेअंतर्गत भारतात एसी आणि एलईडी लाईट्सचे महत्त्वाचे घटक तयार होत असल्यामुळे निर्माण झालेला बाजारातील वाढता आत्मविश्वास व मागणी ही या निर्णयामागची कारणे आहेत.
ही अर्ज करण्याच्या मुदतीची सवलत पीएलआयडब्ल्यूजी योजनेत नमूद केलेल्या त्याच अटी व शर्तींवर आधारित असेल. या योजनेची अधिसूचना 16.04.2021 रोजी प्रसिद्ध झाली असून मार्गदर्शक सूचना 04.06.2021 रोजी जारी करण्यात आल्या आहेत (दरम्यान आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या आहेत).
योजनेची अर्ज खिडकी 15 सप्टेंबर 2025 पासून 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत (दोन्ही दिवस धरून) खुली राहील. ऑनलाईन अर्ज याच पोर्टलवर (https://pliwg.dpiit.gov.in/) स्वीकारले जातील. अर्ज खिडकी बंद झाल्यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
संपूर्ण योजनेच्या मार्गदर्शक सूचना येथे उपलब्ध आहेत :
https://pliwg.dpiit.gov.in/docs/Consolidated_Guidelines_PLIScheme_23October2023.pdf
आणि योजनेची अधिसूचना येथे उपलब्ध आहे :
https://dpiit.gov.in/sites/default/files/PLIWG-Notification-16042021_10May2021.pdf
यात आज पर्यंत , 83 अर्जदारांना लाभार्थी म्हणून निवडण्यात आले असून त्यांनी एकूण ₹ 10,406 कोटींची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. या गुंतवणुकीमुळे भारतात सध्या पुरेशा प्रमाणात तयार न होणाऱ्या घटकांसह एयर कंडीशनर आणि एलईडी लाईटच्या संपूर्ण मूल्यसाखळीतील घटक उत्पादनाला चालना मिळेल.
***
सुषमा काणे / नितीन गायकवाड / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2166541)
Visitor Counter : 2