इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
बीएफएसआय क्षेत्रातील आधार प्रमाणीकरणावरील कार्यशाळेला युआयडीएआय चे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांनी संबोधित केले.
प्रविष्टि तिथि:
14 SEP 2025 3:18PM by PIB Mumbai
पुण्यातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कृषी बँकिंग महाविद्यालयामध्ये 12 सप्टेंबर 2025 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या बिगर बँकिंग वित्त संस्थांसाठी (NBFCs) केवायसी, एएमएल आणि सीएफडी या विषयांवरील कार्यशाळेत, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (युआयडीएआय )मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांनी बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (बीएफएसआय) क्षेत्रातील आधार प्रमाणीकरण या विषयावर भाषण दिले.

त्यानंतर, पुण्यात आयोजित दोन मँन्डेटरी बायोमेट्रीक अपडेट (MBU) शिबिरांपैकी माधव सदाशिव गोळवलकर गुरूजी विद्यालयात आयोजित एका शिबिराला भेट दिली. दुसरे भव्य अनिवार्य बायोमेट्रीक अपडेट (MBU) शिबीर गेनबा मोझे प्रशाला, येरवडा इथे गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. ही भव्य अनिवार्य बायोमेट्रीक अपडेट शिबिरे दोन किंवा अधिक शाळांच्या क्लस्टरमध्ये आयोजित केली जात आहेत. पुण्यातील शाळांतील या भव्य शिबिरांमध्ये सहा आधार किट (महाराष्ट्र शालेय शिक्षण विभाग आणि टपाल विभागाचे प्रत्येकी तीन) चालवले जात आहेत.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधताना, भुवनेश कुमार यांनी, विद्यार्थ्याचे आधार अद्ययावत ठेवण्यासाठी मिशन मोडमध्ये अनिवार्य बायोमेट्रीक अपडेट शिबिरे राबवण्याचे महत्त्व अधोरेखित केले, त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध परीक्षांसाठी प्रमाणीकरण करणे सुलभ होते. त्यांनी आधार किटचे संचालक आणि शालेय शिक्षण विभाग तसेच टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांशीही संवाद साधला आणि त्यांनी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणासमवेत (UIDAI) संयुक्तपणे शिबीर आयोजित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने, UDISE+ पोर्टलसह आधार अद्ययावतीकरणाची माहिती एकत्र करून सर्व शाळांतील 5 ते 17 वर्ष वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी मिशन मोडवर अनिवार्य बायोमॅट्रीक अपडेट मोहीम सुरू केली आहे.
आधार कार्डचे बायोमेट्रिक अपडेट 5 ते 7 वर्षे आणि 15 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोफत आहे. तर 7 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी प्रति बायोमेट्रिक अपडेट 100 रुपये आकारले जाते. ही मोहीम भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI), महाराष्ट्राचा शालेय शिक्षण विभाग आणि टपाल विभाग (भारत सरकार) तसेच महाराष्ट्र सरकारचा माहिती तंत्रज्ञान विभाग यांसारख्या विभागांदरम्यानचा समन्वित प्रयत्न आहे.

***
सुषमा काणे / विजयालक्ष्मी साळवी - साने / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2166528)
आगंतुक पटल : 31
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English