अर्थ मंत्रालय
आर्थिक समावेशन योजनांसाठी कुंभारजुवा इथे संपूर्णता शिबिराचे आयोजन, 3 महिने सुरू असलेल्या मोहिमेत आतापर्यंत 165 ग्रामपंचायतींचा समावेश
Posted On:
11 SEP 2025 7:37PM by PIB Mumbai
पणजी, 11 सप्टेंबर 2025
आर्थिक समावेशन योजनांच्या तीन महिन्यांच्या संपूर्णता मोहिमेचा एक भाग म्हणून, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उपक्रमाअंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्रच्या सहकार्याने उत्तर गोव्यातील तिसवाडी तालुक्यातल्या कुंभारजुवा ग्राम पंचायतीमध्ये 09.09.2025 रोजी एक शिबीर आयोजित करण्यात आले होते.

कुंभारजुवा मतदारसंघाचे आमदार राजेश फलदेसाई आणि केंद्र सरकारच्या वित्तीय सेवा विभागाच्या संचालक नीलम अग्रवाल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
QYZM.jpeg)
या कार्यक्रमात आमदार राजेश फलदेसाई यांनी कुंभारजुवा पंचायतीत योजनांच्या शंभर टक्के नोंदणीसाठी सर्व नागरिकांनी या योजनांसाठी नावनोंदणी करावी असे आवाहन उपस्थितांना केले. यामुळे विकसित भारत 2047 हे स्वप्न साकारण्यासाठी आपण हळूहळू सक्षम होऊ, असे ते म्हणाले.
नीलम अग्रवाल यांनी आर्थिक साक्षरतेचा प्रसार करण्यात आणि डिजिटल घोटाळे रोखण्यातील रिझर्व्ह बँकेची भूमिका अधोरेखित केली. बँकेच्या सुविधांचा सुरळीतपणे लाभ घेता यावा यासाठी ग्रामस्थांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन त्यांनी केले. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा लाभ मिळविण्यातही याची मदत होईल असे सांगून त्या म्हणाल्या की, आतापर्यंत गोवा राज्यात 165 ग्राम पंचायतींना PMJDY, PMJJBY, PMSBY, APY यासारख्या जनसुरक्षा योजनांच्या संपूर्णतेसाठी व केवायसी पुनर्तपासणीसाठी समाविष्ट करण्यात आले आहे.

कुंभारजुवा ग्राम पंचायतीचे सरपंच सचिन गावडे, उत्तर गोवा जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी पुंडलिक खोर्जुवेणकर, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गोवा क्षेत्रीय संचालक प्रभाकर झा, नाबार्डचे महाव्यवस्थापक संदीप धारकर, भारतीय स्टेट बँक एलएचओ मुंबईचे विभागीय उप महाव्यवस्थापक दया शंकर आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय प्रमुख आनंद डिंगणकर यावेळी उपस्थित होते.
सर्वप्रथम भारतीय स्टेट बँक पणजीचे उपमहाव्यवस्थापक शैलेंद्र मिश्रा यांनी मान्यवरांचे स्वागत केले आणि ग्रामस्थांनी या मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन विविध योजनांसाठी आपली नावे नोंदवावीत असे आवाहन केले. या शिबिराला ग्रामस्थांनी प्रचंड प्रतिसाद दिला. भारतीय स्टेट बँक पणजीचे सहाय्यक महाव्यवस्थापक कार्लोस रॉड्रीग्ज यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सोनाली काकडे/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2165806)
अभ्यागत कक्ष : 14