संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडच्या वतीने 12 सप्टेंबरला ‘स्ट्राइड’-संरक्षण तंत्रज्ञान 2025 विषयी चर्चासत्राचे आयोजन

प्रविष्टि तिथि: 11 SEP 2025 3:32PM by PIB Mumbai

पुणे ,11 सप्टेंबर 2025

भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडच्या वतीने  पुण्यातील आरएसएएमआय येथे स्ट्राइड ( म्हणजेच- तंत्रज्ञान, संशोधन, उद्योग आणि संरक्षण परिसंस्थेचे समन्वय) या संरक्षण तंत्रज्ञान 2025 विषयक चर्चासत्राचे  आयोजन  केले आहे.

या चर्चासत्राच्या केंद्रस्थानी "उद्योग, शैक्षणिक संस्था, सशस्त्र दल यांच्या भागीदारीद्वारे आत्मनिर्भरता" ही संकल्पना आहे. चर्चासत्रामध्ये  या  विषयावर होणा-या  परिसंवादाचे उद्दिष्ट शैक्षणिक, उद्योग, संशोधन संस्था आणि सशस्त्र दलांमधील देशातील आघाडीच्या भागधारकांना एकत्र आणणे, सहकार्य वाढवणे, स्वदेशी क्षमता विकासाला गती देणे आणि संरक्षणात क्रांतिकारी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे आहे.

या कार्यक्रमाला संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, आयएएस, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ (पीव्हीएसएम, एव्हीएसएम, जीओसी-इन-सी, दक्षिण कमांड)  यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि संरक्षण परिसंस्थेतील मान्यवर  प्रतिनिधी उपस्थित राहतील.

चर्चासत्राचे ठळक मुद्दे:

तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्‍याच्या कार्याला  गती देण्यासंबंधी  संरक्षण सचिवांचे बीजभाषण.

तज्ज्ञमंडळ चर्चा:

1.स्वदेशी प्रणालींसाठी वैशिष्‍ट्यपूर्ण  वेगवान  ‘ट्रॅकिंग’ पद्धती विकसित करणे  -  रिव्हर्स इंजिनिअरिंग, उद्योग-निधीतून   शैक्षणिक संशोधन आणि डीआरडीओची भूमिका 

2.भारतीय संरक्षण उत्पादन परिसंस्थेची वाढ - खाजगी उद्योग, सार्वजनिक उपक्रम आणि शैक्षणिक संस्थांच्या योगदानावर लक्ष केंद्रित करणे.  

स्वदेशी नवोपक्रमांच्या माध्‍यमातून तयार केलेल्या उपकरणांचे  प्रदर्शन करणे  आणि संवाद साधणे
राष्ट्रीय सुरक्षेच्या भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी भागीदारी जोपासताना एक मजबूत, आत्मनिर्भर  संरक्षण औद्योगिक पाया तयार करण्याच्या दिशेने हे चर्चासत्र एक मोठे पाऊल आहे.


सोनाली काकडे/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2165770) आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Marathi , Marathi