शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयआयएम मुंबई आणि ‘कला’ यांचा ‘परफॉर्मिंग आर्ट्स’मध्ये सर्जनशील नेतृत्व या विषयामध्‍ये उद्योग व्यवसायाप्रमाणे व्यवस्थापनातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी करार

Posted On: 10 SEP 2025 8:07PM by PIB Mumbai

मुंबई, 10 सप्टेंबर 2025 

भारतीय व्यवस्थापन संस्था मुंबई (आयआयएम मुंबई) यांनी ‘कला’ (संस्थापक कैलाश खेर) या सर्जनशील शिक्षण यात अग्रगण्य असणाऱ्या संस्थेबरोबर भागीदारी जाहीर केली आहे. या भागीदारीतून उद्योग-  व्यवसाय व्यवस्थापनातील एक वर्षाचा सर्जनशील क्षेत्रामध्‍ये नेतृत्व करता यावे यासाठी  परफॉर्मिंग आर्ट्स म्हणजे सादरीकरण केले जाणा-या कलेला व्यवसायाचे स्वरूप देण्‍यासाठी  शिक्षण देणारा पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम  सुरू केला जाणार आहे.

हा कार्यक्रम जून 2026 पासून मे 2027 पर्यंत राबविला जाईल. हा अभ्‍यासक्रम  ‘परफॉर्मिंग आर्ट्स’ क्षेत्रातील आघाडीचे विद्यार्थी, सर्जनशील उद्योजक आणि दूरदर्शी कलाकार यांच्यासाठी तयार करण्यात आला आहे, ज्यांना कलात्मक नवोन्मेष आणि व्यवसाय नेतृत्व यांच्यामध्‍ये  समन्वय कसा  साधायचा, याचे ज्ञान घ्यायचे  आहे, त्‍यांच्यासाठी हा अभ्‍यासक्रम तयार केला आहे.

या प्रसंगी बोलताना भारतीय व्यवस्थापन संस्था मुंबईचे संचालक प्रा. मनोज के. तिवारी म्हणाले, “कला या संस्थेसोबत ची आमची भागीदारी ही आयआयएम मुंबईच्या सहकार्याने , नवोन्मेषी आणि परिवर्तनशील नेते कला क्षेत्रामध्‍येही घडविण्याच्या ध्येयावर आधारित आहे. उद्योजक व्यवस्थापनातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा कार्यक्रम सर्जनशील नेतृत्व वाढवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हा कलात्मकता आणि धोरणात्मक दृष्टीकोनाचा तो महत्त्वपूर्ण संगम असेल ज्याची आज जगाला गरज आहे.”

आपले विचार मांडताना ‘कला’ चे संस्थापक, पद्मश्री कैलाश खेर म्हणाले, “परफॉर्मिंग आर्ट्स, म्हणजे  कलाकार केवळ रंगमंचावर आपली कला कशी  सादर करतो हे पाहण्‍याबरोबरच तो  आपल्या समाजात आणि  कार्यस्थळांवर कसे नेतृत्व करतो हे पाहिले पाहिजे. हा सहयोग सर्जनशील नेतृत्व व्यवसाय शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.”

उद्योजक व्यवस्थापनातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम मध्ये वैयक्तिक ब्रँडिंग, कलात्मक पाया, प्रकल्प कार्यान्वयन, आर्थिक साक्षरता, विपणन, नेतृत्व आणि उद्योजकता यांचा अद्वितीय संगम आहे. या अभ्यासक्रमात कठोर सर्जनशील आणि  धोरणात्मक विचारांना चालना दिली जाईल. सहभागी विद्यार्थ्यांना नाट्य, संगीत, नृत्य आणि योग यांचा व्यवस्थापनाच्या चौकटींसोबत अनुभव देण्यात येईल, ज्यामुळे ते भावनिक बुद्धिमत्ता, अनुकूलता आणि लवचिकतेसह गुंतागुंतीच्या वास्तव जगातील आव्हानांचा सामना करू शकतील.

हा सहयोग आयआयएम मुंबईच्या आंतरशाखीय नेतृत्व शिक्षणातील वचनबद्धतेला अधोरेखित करतो. यामुळे संस्थेचे कार्यक्षेत्र पारंपरिक व्यवसाय व्यवस्थापन कार्यक्रमांपलीकडे विस्तारून कलात्मक नेतृत्व विकासाचा समावेश करेल. कला सोबतच्या या भागीदारीमुळे आयआयएम मुंबई आपली शैक्षणिक उत्कृष्टता सर्जनशील संदर्भात घेऊन येते आणि पदवीधरांना सांस्कृतिक व कॉर्पोरेट क्षेत्रातील सर्वंकष नेते म्हणून उदयास येण्यासाठी सक्षम करते.

जून 2026 च्या गटासाठी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होईल. पात्रता निकष, अभ्यासक्रम आणि अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखांबाबत सविस्तर माहितीकरिता कृपया iimmumbai.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी  किंवा आयआयएम मुंबईच्या कार्यकारी शिक्षण कार्यालयाशी संपर्क साधावा.


सुवर्णा बेडेकर/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2165491) अभ्यागत कक्ष : 20
Read this releasein: English