कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
भारत-सिंगापूर संयुक्त कार्यगटाची कार्मिक व्यवस्थापन आणि सार्वजनिक प्रशासनावरील बैठक
Posted On:
10 SEP 2025 10:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2025
कार्मिक व्यवस्थापन आणि सार्वजनिक प्रशासनावरील भारत-सिंगापूर संयुक्त कार्यगटाची बैठक 10.09.2025 रोजी झाली. भारताकडून डीएआरपीजीचे सचिव व्ही. श्रीनिवास आणि सिंगापूरकडून सार्वजनिक सेवा विभागाच्या सीईओ सेझ लिंग लिम यांनी या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले. परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय उच्चायोग, सिंगापूर आणि सार्वजनिक सेवा विभाग, सिंगापूरचे अतिरिक्त सचिव पुनीत यादव आणि डीएआरपीजीचे इतर अधिकारी आणि सिंगापूरमधील सार्वजनिक सेवा विभागाचे वरिष्ठ पातळीचे शिष्टमंडळ देखील जेडब्ल्यूजी बैठकीला उपस्थित होते. उभय देशांनी त्यांचे सादरीकरण सामायिक केले. भारतीय बाजूने नेक्स्ट जनरेशन सीपीजीआरएएमएस आणि नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिस डिलिव्हरी असेसमेंट (एनईएसडीए) अर्थात राष्ट्रीय ई-प्रशासन सेवा वितरण मूल्यांकन सामायिक करण्यात आले. सिंगापूरच्या बाजूने लाईफ एसजी सामायिक करण्यात आले. लाईफ एसजी हे जीवनातील महत्त्वाच्या क्षणांमध्ये नागरिकांना सरकारी सेवा एकत्रित करण्यासाठी एक डिजिटल मंच आहे.
दोन्ही देशांमधील नागरिकांच्या हितासाठी सार्वजनिक सेवा वितरण प्रणालींची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि प्रतिसाद वाढविण्यासाठी सर्वोत्तम पद्धती, संस्थात्मक सहकार्य आणि संयुक्त नवोन्मेषांच्या देवाणघेवाणीद्वारे कार्मिक व्यवस्थापन आणि सार्वजनिक प्रशासन क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्यासाठी भारत आणि सिंगापूर वचनबद्ध आहेत.
सुवर्णा बेडेकर/वासंती जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2165473)
Visitor Counter : 8