दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ट्रायकडून संपूर्ण गोवा (दक्षिण) आणि आसपासच्या भागातील नेटवर्कच्या गुणवत्तेचे मूल्यांकन

Posted On: 04 SEP 2025 10:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 सप्‍टेंबर 2025

 

भारत दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) जुलै 2025 मध्ये गोवा (दक्षिण), महाराष्ट्र परवानाधारक सेवा क्षेत्र (एलएसए) साठी विस्तृत शहर/महामार्ग मार्गांचा समावेश असलेल्या स्वतंत्र ड्राइव्ह चाचणीचे (आयडीटी) निष्कर्ष जाहीर केले. बेंगळुरू येथील ट्राय प्रादेशिक कार्यालयाच्या देखरेखीखाली घेण्यात आलेल्या या ड्राइव्ह चाचण्या, शहरी क्षेत्रे, संस्थात्मक हॉटस्पॉट, सार्वजनिक वाहतूक केंद्रे आणि हाय-स्पीड कॉरिडॉर अशा विविध वापराच्या वातावरणात वास्तविक जगातील मोबाइल नेटवर्कची कामगिरी टिपण्यासाठी करण्यात आली होती.

22 जुलै 2025 ते 25 जुलै 2025 दरम्यान, ट्रायच्या टीमने 261.8 किलोमीटरच्या शहर चाचणी, 3.9 किलोमीटरच्या किनारपट्टीवरील चाचणी, 8.9 किलोमीटरच्या चालण्याची चाचण्या आणि 09 हॉटस्पॉट तपशीलवार चाचण्या केल्या.  मूल्यमापन केलेल्या तंत्रज्ञानामध्ये 2जी, 3जी, 4जी आणि 5जी यांचा समावेश होता, जे अनेक हँडसेट क्षमतांमधील वापरकर्त्यांचा सेवा अनुभव दाखवते.  पुढील आवश्यक कारवाईसाठी आयडीटीच्या निष्कर्षांची माहिती सर्व संबंधित टीएसपीना देण्यात आली आहे.

मुख्य मापदंडांचे मूल्यांकन:

a) आवाज सेवा: कॉल सेटअप करण्याचा यशस्वी वेग (सीएसएसआर) ड्रॉप कॉल वेग (डीसीआर) कॉल सेटअप वेळ, कॉल सायलेन्स वेग, स्पीच क्वालिटी (एमओएस) कव्हरेज.

b) डेटा सेवा: डाउनलोड/अपलोड थ्रूपुट, लेटेंसी, जिटर, पॅकेट ड्रॉप रेट आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग विलंब.

कॉल सेटअप सक्सेस वेग - एअरटेल, बीएसएनएल, आरजेआयएल आणि व्हीआयएलचा कॉल सेटअप सक्सेस वेगअनुक्रमे 95.33%, 94.03%, 99.18% आणि 96.54% आहे).

ड्रॉप कॉल वेग - एअरटेल, बीएसएनएल, आरजेआयएल आणि व्हीआयएलचा ड्रॉप कॉल दर अनुक्रमे 0.43%, 3.94%, 0.62% आणि 1.27% (5G/4G/3G/2G) आहे.)

मुख्य क्यूओएस मापदंडांच्या तुलनेत कामगिरीचा सारांश

सीएसएसआर: कॉल सेटअप यशस्वी वेग म्हणजे (% मध्ये) सीएसटी: कॉल सेटअप वेळ (सेकंदात) डीसीआर: कॉल ड्रॉप वेग (% मध्ये) आणि एमओएस: ठराविक आवाजाच्या गुणवत्तेचे प्रतिनिधित्व करणारे सरासरी मत स्कोअर.

 

सारांश - आवाज सेवा

 

कॉल सेटअप यशस्वी वेग: ऑटो-सिलेक्शन मोडमध्ये (5जी/4जी/3जी/2जी) एअरटेल, बीएसएनएल, आरजेआयएल आणि व्हीआयएलचा कॉल सेटअप यशस्वी वेगअनुक्रमे 95.33%, 94.03%, 99.18% आणि 96.54% आहे.

कॉल सेटअप वेळ: ऑटो-सिलेक्शन मोडमध्ये (5जी/4जी/3जी/2जी) एअरटेल, बीएसएनएल, आरजेआयएल आणि व्हीआयएलचा कॉल सेटअप वेळ अनुक्रमे 0.89, 4.13, 0.87 आणि 1.08 सेकंद आहे.

ड्रॉप कॉल वेग: ​​ऑटो-सिलेक्शन मोडमध्ये (5जी/4जी/3जी/2जी) एअरटेल, बीएसएनएल, आरजेआयएल आणि व्हीआयएलचा ड्रॉप कॉल दर अनुक्रमे 0.43%, 3.94%, 0.62% आणि 1.27% आहे.

कॉल सायलेन्स/म्यूट वेग: पॅकेट स्विच्ड नेटवर्क (4जी/5जी) मध्ये एअरटेल, आरजेआयएल आणि व्हीआयएलचा सायलेन्स कॉल रेट अनुक्रमे 2.48%, 2.55% आणि 1.98% आहे.

सरासरी मत स्कोअर (एमओएस): एअरटेल, बीएसएनएल, आरजेआयएल आणि व्हीआयएलचा सरासरी एमओएस अनुक्रमे 3.98, 2.48, 3.79 आणि 3.97 आहे.

सारांश-डेटा सेवा

 

डेटा डाउनलोड कामगिरी (एकंदर): एअरटेल (5जी/4जी/2जी) चा सरासरी डाउनलोड वेग 90.05 एमबीपीएस, बीएसएनएल (4जी/3जी/2जी) 1.26 एमबीपीएस, आरजेआयएल (5जी/4जी) 143.94 एमबीपीएस आणि व्हीआयएल (4जी/2जी) 26.45 एमबीपीएस आहे.

डेटा अपलोड कामगिरी (एकंदर): एअरटेल (5जी/4जी/2जी) चा सरासरी अपलोड वेग 17.33 एमबीपीएस, बीएसएनएल (4जी/3जी/2जी) 2.09 एमबीपीएस, आरजेआयएल (5जी/4जी) 20.77 एमबीपीएस आणि व्हीआयएल (4जी/2जी) 11.36 एमबीपीएस आहे.

लेटन्सी (एकूण): एअरटेल, बीएसएनएल, आरजेआयएल आणि व्हीआयएल यांचा 50 वा पर्सेंटाइल लेटन्सी अनुक्रमे 24.15 मिलीसेकंद, 58.50 मिलीसेकंद, 29.25 मिलीसेकंद आणि 22.80 मिलीसेकंद आहे.

डेटा कामगिरी - हॉटस्पॉट (Mbps मध्ये):

एअरटेल- 4G D/L: 56.41 4G U/L: 6.80

5G D/L: 178.70 5G U/L: 19.49

BSNL- 4G D/L: 1.15 4G U/L: 2.88

RJIL- 4G D/L: 31.14 4G U/L: 7.51

5G D/L: 157.02 5G U/L: 18.34

VIL- 4G D/L: 37.61 4G U/L: 10.92

टीप- “D/L” डाउनलोड गती, “U/L” अपलोड गती

 

गोव्यातील (दक्षिण) मूल्यांकनात वास्को द गामा, कोल्वा, कुंकळी, कोलसर, बाली, केपे, चंदोर, दावोर्ली, मडगाव, वेरणा, कोराली आणि बांबोळी इत्यादी उच्च-घनतेच्या परिसरांचा समावेश होता.

ट्रायने बिग फूट गोवा, बिर्ला मंदिर, कोल्वा बीच, दाबोळी विमानतळ, दोनापावला, मडगाव रेल्वे स्थानक, मिरामार बीच, श्री महालसा नारायणी देवालय, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालय येथील वास्तविक जगाच्या परिस्थितीचे मूल्यांकन केले.

24 जुलै 2025 रोजी गोवा वैद्यकीय महाविद्यालय, पणजी केटीसी बसस्थानक, पणजी बाजार आणि वास्को द गामा रेल्वे स्थानकावर चालण्याच्या चाचण्या घेण्यात आल्या, ज्यात गर्दीच्या पादचाऱ्यांच्या वातावरणात मोबाइल नेटवर्कचे वर्तन टिपण्यात आले.

मार्गावरील सेवेचा दर्जा समजून घेण्यासाठी मंडोवी पुलापासून मिरामार समुद्रकिनार्यापर्यंत किनारपट्टीवरील चाचणी घेण्यात आली.

या चाचण्या ट्राय-कॅलिब्रेटेड उपकरणे आणि प्रमाणित प्रोटोकॉल वापरून प्रत्यक्ष-वेळेच्या वातावरणात घेण्यात आल्या. सविस्तर अहवाल ट्राय www.trai.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणत्याही स्पष्टीकरणासाठी/माहितीसाठी, श्री ब्रजेंद्र कुमार, सल्लागार (प्रादेशिक कार्यालय, बेंगळुरू) ट्राय यांच्याशी adv.bengaluru@trai.gov.in या ईमेलवर किंवा +91-80-22865004 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

 

* * *

जयदेवी पुजारी स्‍वामी/निलिमा चितळे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2164024) Visitor Counter : 2
Read this release in: English , Urdu , Hindi