ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रत्नागिरी येथे एनटीपीसीने ‘भागधारक व्यवस्थापन’ विषयावर प्रादेशिक कार्पोरेट कम्युनिकेशन्स बैठक आणि कार्यशाळा केली आयोजित

प्रविष्टि तिथि: 03 SEP 2025 5:33PM by PIB Mumbai

 

एनटीपीसी पश्चिम क्षेत्र-1 मुख्यालय (डब्ल्यूआर-1 मुख्यालय) यांच्यावतीने सोमवार (1 सप्टेंबर 2025) रोजी रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड (आरजीपीपीएल), रत्नागिरी येथे भागधारक व्यवस्थापनया विषयावर प्रादेशिक कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स बैठक आणि कार्यशाळा आयोजित केली होती.

या कार्यशाळेला रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड (आरजीपीपीएल) चे प्रादेशिक कार्यकारी संचालक (पश्चिम-1) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कुमार तखेले तसेच एनटीपीसी पश्चिम क्षेत्र - 1 प्रकल्प आणि केंद्रांचे सर्व व्यापार केंद्र प्रमुख आणि मानव संसाधन अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात संपूर्ण प्रदेशातील वरिष्ठ अधिकारी, प्राध्यापक आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स व्यावसायिकही सहभागी झाले होते.

या बैठकीची सुरुवात दीपप्रज्वलन आणि एनटीपीसी गीतासह औपचारिक उद्घाटनाने झाली, त्यानंतर मानव संसाधन विभागाच्या प्रादेशिक प्रमुख वंदना चतुर्वेदी यांनी स्वागतपर भाषण केले. तखेले यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात संस्थात्मक विश्वास आणि सक्षमता निर्माण करण्यात भागधारकांच्या सहभागाची आणि पारदर्शक संवादाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली.

कार्यशाळेत अनेक नामवंत तज्ञांच्या विचार प्रवर्तक आणि अभ्यासपूर्ण सत्रांची मालिका आयोजित करण्यात आली होती:

दिवंशी गुप्ता (द मार्कोम अव्हेन्यू कंपनीच्या संस्थापक आणि संचालक) — “सार्वजनिक उपक्रमांसाठी धोरणात्मक सामाजिक माध्यम: डिजिटल युगात सार्वजनिक विश्वास, पारदर्शकता आणि प्रतिष्ठा वाढवणे.

आकृती भार्गव (विझीकी कंपनीच्या सह-संस्थापक) — “ कृत्रिम बुद्धिमत्ता : सार्वजनिक क्षेत्रातील संवाद आणि जनसंपर्क क्षेत्रात परिवर्तन

जितेंद्र भार्गव (एअर इंडियाचे माजी कार्यकारी संचालक) — “अर्जंट च्या काळातील नेतृत्व : संकट व्यवस्थापनातील धोरणात्मक संवाद आणि भागीदार व्यवस्थापन.

के. एम. प्रशांत (एनटीपीसी कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सचे प्रमुख) - माहितीपासून सहभागापर्यंत : एनटीपीसीमधील अंतर्गत संवाद सुधारण्याचे प्रयत्न.

या कार्यक्रमात एनटीपीसी पश्चिम क्षेत्र-1 प्रकल्पांमधील कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स टीम्सनी संकट व्यवस्थापन आणि संस्थात्मक ब्रॅण्ड उभारणीवरील केस स्टडी सादरीकरणे केली आणि उल्लेखनीय उपक्रमांचा गौरव करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना, तखेले म्हणाले: प्रभावी भागधारकांचा सहभाग हा शाश्वत विकासाचा केंद्रबिंदू आहे. अशा कार्यशाळा आपल्या चमूला ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी, संवाद धोरणे एकसंध करण्यासाठी आणि संस्थेची मजबूत प्रतिमा घडवण्यासाठी एक अमूल्य व्यासपीठ प्रदान करतात.

के. एम. प्रशांत म्हणाले, “हे प्रादेशिक संमेलन केवळ ज्ञान-सामायिकरण मंच नाहीत तर मजबूत, सक्रिय संवादाचे ठोस भाचे निर्माण करणारे उत्प्रेरक आहेत. पारदर्शकता आणि सहकार्य वाढवून, आम्ही एनटीपीसी सार्वजनिक विश्वास आणि कार्यकुशलता कायम ठेवू.

या बैठकीत एनटीपीसी पश्चिम क्षेत्र -1 ने भागधारकांशी संबंध मजबूत करणे, संवाद धोरणे अधिक प्रभावी करणे आणि एक सुसंगत आणि विश्वासार्ह ब्रँड प्रतिमा घडवण्याची आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली.

***

शैलेश पाटील / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2163501) आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English