आयुष मंत्रालय
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे ब्रिक्स सीसीआय आरोग्यसेवा शिखर परिषद 2025 संपन्न
प्रविष्टि तिथि:
29 AUG 2025 9:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2025
केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) व आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज नवी दिल्ली येथे "परंपरा आणि नवोन्मेषाची सांगड" या विषयावर आयोजित ब्रिक्स सीसीआय आरोग्यसेवा शिखर परिषद 2025 चे अध्यक्षस्थान भूषविले.
गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत जाधव यांनी यावर भर दिला की जगातील जवळपास अर्धी लोकसंख्या असणाऱ्या तसेच जागतिक जीडीपीच्या एक तृतीयांश आणि जागतिक व्यापाराच्या एक पंचमांश भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ब्रिक्सने समावेशक आणि शाश्वत विकासाला गती देण्यासाठी एकत्रितपणे काम केले पाहिजे.
ब्राझीलमधील आयुर्वेदिक व्यावसायिकांच्या समुदायांपासून ते रशियाच्या आरोग्यसेवेच्या चौकटीत आयुर्वेदाचा समावेश आणि चीनमध्ये पारंपरिक औषधांची समांतर प्रगती यासारख्या आयुष प्रणालींच्या वाढत्या जागतिक स्वीकृतींकडे मंत्र्यांनी लक्ष वेधले. आयुर्वेद आणि योगाभ्यासाची जागतिक बाजारपेठ वेगाने विस्तारत असतानाच समावेशक, नैतिक आणि शाश्वत वाढ सुनिश्चित करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. त्यांनी सार्वजनिक-खाजगी भागीदारी, डिजिटल आरोग्य नवोपक्रम, न्यूट्रास्युटिकल संशोधन आणि उद्योजक, नवोन्मेषक व शेतकऱ्यांना मान्यता यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.
जाधव यांनी भर दिला की मजबूत आंतर-ब्रिक्स सहकार्य आणि सुसंवादी चौकटी आयुष उत्पादनांसाठी बाजारपेठांचा विस्तार करू शकतात, आर्थिक असुरक्षा कमी करू शकतात तसेच आरोग्य आणि निरामयता यात भारताला जागतिक नेता म्हणून स्थापित करण्यास मदत करू शकतात.
आयुष मंत्रालयाने 25 देशांसोबत सामंजस्य करार केले असून यामुळे पारंपरिक औषधांमधील आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी एक मजबूत पाया तयार झाला असल्याचे जाधव म्हणाले. त्यांनी ब्रिक्स राष्ट्रांना नवीन आघाड्या तयार करण्यासाठी आणि परंपरा व नवोन्मेष यांची सांगड घालून आरोग्यसेवेची प्रारूपे पुढे नेण्यासाठी या शिखर परिषदेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.


M1YJ.jpeg)
FTXU.jpeg)
सोनाली काकडे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2162097)
आगंतुक पटल : 31