ऊर्जा मंत्रालय
राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा केंद्राच्या पश्चिम विभाग-I मुख्यालयातर्फे पवई येथींल वसाहतीतील मुख्यालयात राष्ट्रीय क्रीडादिन उत्साहात साजरा
Posted On:
29 AUG 2025 5:19PM by PIB Mumbai
मुंबई, 29 ऑगस्ट 2025
तंदुरुस्ती, आरोग्य,आणि सामूहिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित करत,राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा केंद्र पश्चिम क्षेत्र- I मुख्यालयातर्फे पवई वसाहतीत राष्ट्रीय क्रीडा दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला.

एनटीपीसी डब्ल्यूआर- I मुख्यालयातील या सोहळ्याची सुरुवात एका वॉकेथॉनने झाली, ज्यामध्ये कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांतील सदस्यांनी उत्साहाने भाग घेतला. वॉकेथॉननंतर,क्षेत्रीय कार्यकारी संचालक (पश्चिम-I) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (आरजीपीपीएल) संतोष कुमार तखेले यांनी ‘फिट इंडियाची’ सर्वांना शपथ दिली, सर्वांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्यास आणि तंदुरुस्तीला त्यांच्या दैनंदिन दिनचर्येचा अविभाज्य भाग बनवण्याचे आवाहन केले.
2UEI.jpeg)
या कार्यक्रमाला मनुष्यबळ विभागाच्या (पश्चिम-I) क्षेत्रीय प्रमुख वंदना चतुर्वेदी यांच्यासह एनटीपीसी डब्ल्यूआर-l मुख्यालय, एनजीईएल आणि न्यूक्लियर सेलमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, त्यामुळे हा सोहळा संस्मरणीय झाला. त्यांची उपस्थिती आणि सक्रिय सहभाग एनटीपीसीची आपल्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आणि आरोग्यदायी-जीवनमानाला प्रोत्साहन देण्यासाठीची वचनबद्धता दर्शवितो.
शांततापूर्ण आणि प्रगतीशील समाजांना प्रोत्साहन देण्यासाठी खेळाचा माध्यम म्हणून वापर करण्याच्या राष्ट्रीय दृष्टिकोनाच्या अनुषंगाने, कामाच्या ठिकाणी आणि त्यापलीकडेही - आरोग्य तंदुरुस्ती, सौहार्द आणि सामूहिक जबाबदारीची संस्कृती जोपासण्याला एनटीपीसी डब्ल्यूआर- I मुख्यालयाच्या या पवई वसाहतीत झालेल्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या समारंभाने आपले समर्थन दिले.
दिग्गज हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी देशात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. या दिवशी क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान केला जातो तसेच शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व अधोरेखित केले जाते. "ऐक्य, सद्भाव आणि सौहार्द वाढविण्याच्या खेळांच्या भूमिकेवर प्रकाश टाकत "शांततापूर्ण समाजासाठी खेळ" ही 2025 या वर्षाची संकल्पना आहे.
सोनाली काकडे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2161891)
अभ्यागत कक्ष : 37