आयुष मंत्रालय
मुंबईतील डब्ल्यूएचओ-एसईएआरओ प्रादेशिक कार्यशाळेत भारताने हर्बल जीएमपी नेतृत्वाचे दर्शन घडवले
आयुष मंत्रालयाच्या सीसीआरएएस कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना हर्बल औषध गुणवत्ता मानकांबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले
भारताने हर्बल औषधांमध्ये समन्वित डब्ल्यूएचओ--जीएमपी आणि गुणवत्ता पद्धतींसाठी प्रादेशिक सहकार्य मजबूत केले
Posted On:
22 AUG 2025 10:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2025
केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (CCRAS), आयुष मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटना - आग्नेय आशिया प्रादेशिक कार्यालय (WHO-SEARO) यांनी वनौषधी (हर्बल ) साठी डब्ल्यूएचओ उत्तम निर्माण पद्धती (जीएमपी ) यावर संयुक्तपणे आयोजित केलेल्या चार दिवसीय प्रादेशिक कार्यशाळेचा आज आरआरएपी-केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था, मुंबई येथे समारोप झाला.
या कार्यशाळेत भूतान, थायलंड, श्रीलंका आणि नेपाळसह आग्नेय आशियाई देशांचे प्रतिनिधित्व करणारे 19 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि आघाडीचे भारतीय तज्ज्ञ सहभागी झाले होते. या कार्यक्रमाने जागतिक हर्बल औषध गुणवत्ता मानके मजबूत करण्यासाठी प्रशिक्षण आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी एक सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
भारतातील वनौषधी आणि औषधनिर्माण क्षेत्रातील आघाडीच्या तज्ञांच्या नेतृत्वाखाली 11 तांत्रिक सत्रांद्वारे सहभागींना प्रशिक्षण देण्यात आले. प्रमुख विषयांमध्ये डब्ल्यूएचओ-जीएमपी मार्गदर्शक तत्त्वे, गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली, उत्तम हर्बल प्रक्रिया पद्धती (GHPP), उत्तम कृषी आणि संकलन पद्धती (GACP) आणि आधुनिक गुणवत्ता नियंत्रण प्रोटोकॉल यांचा समावेश होता.
प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा भाग म्हणून, प्रतिनिधींनी इमामीच्या डब्ल्यूएचओ-जीएमपी-प्रमाणित उत्पादन संयंत्र आणि झंडू फाउंडेशन फॉर हेल्थकेअर फार्मला भेट दिली, जिथे त्यांना गुणवत्ता मानके आणि फार्म-टू-फार्मा उत्कृष्टतेचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.
कार्यशाळेला संबोधित करताना, सीसीआरएएसचे महासंचालक प्रा. रविनारायण आचार्य यांनी पारंपारिक ज्ञान आणि आधुनिक गुणवत्ता प्रोटोकॉलची सांगड घालून वनौषधींच्या जागतिक स्वीकृतीला समर्थन देण्याप्रति भारताच्या वचनबद्धतेवर भर दिला. डब्ल्यूएचओ-एसईएआरओचे डॉ. पवन गोदाटवार यांनी वनौषधींसाठी गुणवत्ता आणि सुरक्षितता निकष स्थापित करण्यात भारताची अग्रणी भूमिका अधोरेखित केली.
डब्ल्यूएचओ-जीएमपी, जीएचपीपी आणि जीएसीपी मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यासाठी प्रादेशिक सहकार्य आणि क्षमता मजबूत करण्याच्या दिशेने ही कार्यशाळा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम ठरली. आयुष मंत्रालय, डब्ल्यूएचओच्या भागीदारीसह भारताच्या वनौषधी मानकांना जागतिक सर्वोत्तम पद्धतींना अनुरूप बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे.



शैलेश पाटील/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2159992)