संरक्षण मंत्रालय
नांदेडमधील पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी भारतीय लष्कर तैनात
19 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 7 वाजतापर्यंतच्या परिस्थितीची अद्ययावत माहिती
Posted On:
19 AUG 2025 1:29PM by PIB Mumbai
नांदेड, 19 ऑगस्ट 2025
नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात नागरी प्रशासनाने तातडीने मदत पुरवण्यासाठी दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 23:30 वाजल्यापासून भारतीय लष्कर तैनात केले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

काल रावण गावात लष्कराच्या बचाव पथकाची प्रथम पोहोचलेल्या तुकडीने तपासणी आणि परिस्थितीचा आढावा घेतला.नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षिततेबाबत आणि पुनर्वसन उपायांबाबतच्या परिस्थितीचा सतत आढावा घेतला जात आहे.

सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आता प्रमुख प्रथम पोहोचलेली लष्कराची बचाव पथकाची तुकडी हसनाल गावाकडे रवाना झाला आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे आज सकाळी 10 वाजता हसनाल गावाला भेट देणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर जिल्ह्यातील एकूण पूर परिस्थितीचा व्यापक आढावा घेतला जाईल.
PY6Q.jpeg)
बाधितांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तसेच मदत आणि पुनर्वसन प्रयत्नांना गती देण्यासाठी भारतीय सैन्य नागरी प्रशासनाला पाठिंबा देण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.

सोनल तुपे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2157824)
अभ्यागत कक्ष : 11