दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
महाराष्ट्र आणि गोवा विभागाच्या संचार लेखा नियंत्रक कार्यालयाने 79 वा स्वातंत्र्य दिन नागपूर येथे प्रादेशिक कार्यालयात केला साजरा
Posted On:
15 AUG 2025 4:15PM by PIB Mumbai
मुंबई, 15 ऑगस्ट 2025
महाराष्ट्र आणि गोवा विभागाच्या संचार लेखा नियंत्रक कार्यालयाने नागपूर येथील त्यांच्या प्रादेशिक कार्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीसह साजरा केला.
महाराष्ट्र आणि गोव्याचे संचार लेखा नियंत्रक सतीश चंद्र झा यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद केले. त्यांनी स्वातंत्र्य, जबाबदारी आणि राष्ट्र उभारणीतील सामूहिक प्रयत्नांच्या शाश्वत मूल्यांवर भर दिला.

राष्ट्रध्वज फडकवून कार्यक्रमाला सुरुवात झाली, त्यानंतर राष्ट्रगीत गायन झाले. कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला, ज्यामुळे अभिमान आणि एकतेचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रीय एकात्मता आणि विविधतेची भावना प्रतिबिंबित करणारा देशभक्तीपर गीते आणि सादरीकरण असलेला एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. निवृत्तीवेतनधारकही उत्साहाने कार्यक्रमाला उपस्थित होते. यातून सामुदायिक आणि सामायिक राष्ट्रीय अभिमानाची भावना वृद्धिंगत झाली.

* * *
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/ सुषमा काणे/ दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2156862)