दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबईतील प्रधान मुख्य संपर्क लेखा नियंत्रक कार्यालयात 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा

Posted On: 15 AUG 2025 1:44PM by PIB Mumbai

मुंबई, 15 ऑगस्‍ट 2025

 

प्रधान मुख्य संपर्क लेखा नियंत्रक (प्र. सीसीए), मुंबई यांच्या सीटीओ इमारतीच्या परिसरातील कार्यालयात आज 79 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि राष्ट्रभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

राष्ट्रीय ध्वज फडकावून व राष्ट्रगीत गाऊन या कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी एक सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये देशभक्तीपर गीते व सादरीकरणे करण्यात आली. या कार्यक्रमातून एकता आणि विविधता प्रतिबिंबित झाली.

   

प्रधान मुख्य संपर्क लेखा नियंत्रक शंकरलाल भालोतिया यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले. स्वातंत्र्य, जबाबदारी आणि राष्ट्रनिर्मितीच्या मूल्यांवर प्रकाश टाकत स्वातंत्र्य दिनाच्या महत्त्वावर त्यांनी आपले विचार मांडले. सीसीए महाराष्ट्र व गोवा कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदविला, ज्यामुळे कार्यक्रमाची रंगत व यश अधिकच वाढले.

 

* * *

 

पीआयबी मुंबई | जयदेवी पुजारी स्‍वामी/राज दळेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2156782)
Read this release in: English