माहिती आणि प्रसारण मंत्रालय
सीबीसी गोवा कडून बेतीम येथील शासकीय प्राथमिक शाळेत ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमाचे आयोजन
Posted On:
14 AUG 2025 3:37PM by PIB Mumbai
गोवा, 14 ऑगस्ट 2025
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या गोवा केंद्रीय संचार ब्युरोने (सीबीसी) आज बेतीम येथील शासकीय प्राथमिक शाळेत ‘हर घर तिरंगा -2025’ मोहिमेअंतर्गत एक कार्यक्रम आयोजित केला होता. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वाढवणे, राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता पसरवणे आणि पर्यावरणाबाबत सजगता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8:30 वाजता विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेने झाली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय अभिमान या विषयांवर आपली सर्जनशीलता प्रदर्शित केली. त्यानंतर पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या ‘एक पेड माँ के नाम’ मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. यानंतर, सर्व विद्यार्थ्यांना एकता आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक असलेले राष्ट्रध्वज देण्यात आले. कार्यक्रमाची सांगता बक्षीस वितरण सोहळ्याने झाली. या कार्यक्रमात चिमुरड्या स्पर्धकांच्या कलागुणांचे कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमाला केंद्रीय संचार ब्युरो, गोवाचे प्रसिद्धी अधिकारी रियास बाबू; बेतीम येथील शासकीय प्राथमिक शाळेच्या प्रभारी सुषमा पटवर्धन आणि केंद्रीय संचार ब्युरो गोवाचे प्रसिद्धी अधिकारी शुभम गुडधे उपस्थित होते.


* * *
पीआयबी पणजी | शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 2156395)
अभ्यागत कक्ष : 14