सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जुलै 2025 या महिन्यासाठी 2012 = 100 वर आधारभूत ग्रामीण, शहरी आणि संयुक्त ग्राहक किंमत निर्देशांक

Posted On: 12 AUG 2025 10:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 ऑगस्‍ट 2025

 

I. महत्त्वाची वैशिष्ट्ये:

1. प्रमुख चलनवाढ: जुलै 2025 महिन्यासाठीचा अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकावर (CPI) आधारित वर्ष-दर-वर्ष चलनफुगवट्याचा  दर जुलै 2024च्या तुलनेत 1.55% (तात्पुरता) आहे. जून 2025 च्या तुलनेत जुलै 2025 च्या प्रमुख  चलनवाढीत 55 बेसिस अंकांची घट झाली आहे. जून 2017 नंतर ही वर्ष-दर-वर्ष आधारावरील सर्वात कमी चलनवाढ आहे. 

2. अन्नधान्यावर आधारित चलनवाढ: जुलै 2024 च्या तुलनेत जुलै 2025 या महिन्यासाठीचा अखिल भारतीय ग्राहक अन्नधान्य किंमत निर्देशांकावर (सीएफपीआय) आधारित वर्ष-दर-वर्ष चलनवाढीचा दर -1.76% (तात्पुरता) आहे. ग्रामीण आणि शहरी भागासाठी संबंधित महागाई दर अनुक्रमे -1.74% आणि -1.90% आहे. गेल्या 13 महिन्यांतील सीपीआय (सर्वसाधारण) आणि सीएफपीआयसाठीचे अखिल भारतीय महागाई दर खालीलप्रमाणे आहेत: जून 2025 च्या तुलनेत जुलै 2025 मध्ये अन्नधान्याच्या महागाईत 75 बेसिस अंकांची घट दिसून आली. जुलै 2025 मधील अन्नधान्याचा महागाई दर जानेवारी 2019 नंतरचा आतापर्यंतचा सर्वात कमी महागाई दर आहे.    

3. जुलै 2025 या महिन्यात प्रमुख चलनवाढ आणि अन्नधान्य चलनवाढीत झालेली लक्षणीय घसरण ही प्रामुख्याने अनुकूल पायाभूत परिणामामुळे तसेच डाळी आणि संबंधित उत्पादने, वाहतूक आणि दूरसंचार, भाज्या, तृणधान्ये आणि संबंधित उत्पादने, शिक्षण, अंडी आणि साखर तसेच मिठाई यांच्या महागाईत घट झाल्यामुळे झाली आहे.

4. ग्रामीण महागाई: जुलै 2025 महिन्यात ग्रामीण क्षेत्रातील प्रमुख बाबी आणि अन्नधान्य यांच्या महागाईत लक्षणीय घट दिसून आली. जुलै 2025 मध्ये प्रमुख  महागाई दर 1.18% (तात्पुरता) होता, तर जून 2025 मध्ये हाच दर 1.72% इतका होता. ग्रामीण क्षेत्रातील सीएफपीआय आधारित अन्नधान्य महागाई दर जून 2025 मधील -0.87%च्या तुलनेत जुलै 2025 मध्ये -1.74% (तात्पुरता) असल्याचे दिसून आले आहे.

5. शहरी महागाई: शहरी क्षेत्रातील प्रमुख महागाई दर जून 2025 मध्ये 2.56% होता, त्यात घसरण होऊन जुलै 2025 मध्ये 2.05% (तात्पुरता) इतकी झाली आहे. अन्नधान्याची महागाई  जून 2025 मधील -1.17% वरून जुलै 2025 मध्ये -1.90% (तात्पुरता) अशी घट दर्शवत आहे.

6. गृहनिर्माण क्षेत्रातील महागाई: जुलै 2025 या महिन्यासाठी वर्ष-दर-वर्ष आधारावर गृहनिर्माण क्षेत्रातील महागाई दर 3.17% (तात्पुरता) आहे. जून 2025 या महिन्यात हाच महागाई दर 3.18% होता. गृहनिर्माण क्षेत्रासाठीचा निर्देशांक फक्त शहरी भागासाठी संकलित केलेला आहे.

7. शिक्षण क्षेत्रातील महागाई दर: वर्ष-दर-वर्ष आधारावर जुलै 2025 साठी शिक्षण क्षेत्रातील महागाई दर 4.00% (तात्पुरता) आहे. जून 2025 मध्ये हाच महागाई दर 4.37% होता. हा दर ग्रामीण तसेच शहरी अशा दोन्ही क्षेत्रांसाठीचा एकत्रित शिक्षण महागाई दर आहे.

8. आरोग्य क्षेत्रातील महागाई दर: वर्ष-दर-वर्ष आधारावर जुलै 2025 साठीचा आरोग्य क्षेत्रातील महागाई दर 4.57% (तात्पुरता) आहे. जून 2025 मध्ये ह्याच क्षेत्राचा महागाई दर 4.38% होता. हा दर ग्रामीण तसेच शहरी अशा दोन्ही भागांसाठीचा एकत्रित आरोग्य महागाई दर आहे.

9. परिवहन आणि दळणवळण क्षेत्र: वर्ष-दर-वर्ष आधारावर जुलै 2025 साठी परिवहन आणि दळणवळण क्षेत्रातील महागाई दर 2.12% (तात्पुरता) आहे. जून 2025 मध्ये हाच महागाई दर 3.90% होता. हा दर ग्रामीण तसेच शहरी अशा दोन्ही भागांसाठीचा एकत्रित महागाई दर आहे.

10. इंधन आणि वीज: वर्ष-दर-वर्ष आधारावर जुलै 2025 मध्ये इंधन आणि वीज क्षेत्रातील महागाई दर 2.67% (तात्पुरता) आहे. जून 2025 मध्ये हाच महागाई दर 2.55% होता. हा दर ग्रामीण तसेच शहरी अशा दोन्ही भागांसाठीचा एकत्रित महागाई दर आहे.

11. वर्ष-दर-वर्ष आधारावर जुलै 2025 मध्ये महागाई दर सर्वाधिक राहिलेल्या पहिल्या पाच प्रमुख राज्यांचे तपशील खालील आलेखात दिले आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

* * *

सोनाली काकडे/संजना चिटणीस/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2155882)
Read this release in: English , Urdu , Hindi