रेल्वे मंत्रालय
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रासाठी केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव
Posted On:
08 AUG 2025 11:15PM by PIB Mumbai
मुंबई, 8 ऑगस्ट 2025
गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासाठीच्या रेल्वे अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये लक्षणीय भर पडली आहे. 2009 ते 2014 दरम्यान, महाराष्ट्रात पूर्णतः अथवा अंशतः येणारे पायाभूत सुविधा प्रकल्प आणि सुरक्षा विषयक कामांसाठीची अर्थसंकल्पीय तरतूद वीस पट वाढली आहे. चालू आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंतचा सरासरी खर्च वर्षाला सुमारे 1,171 कोटी रुपये इतका होता. त्यापैकी राज्यातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी 23,778 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
गेल्या तीन वर्षात, म्हणजेच आर्थिक वर्ष 2022-23, 2023-24, 2024-25 आणि चालू आर्थिक वर्षात, महाराष्ट्रात पूर्णतः अथवा अंशतः असलेले सुमारे 47,126 कोटी रुपये खर्चाचे, 1991 किमी लांबीचे 27 मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत.
2009-14 आणि 2014-2024 या काळात महाराष्ट्रात पूर्णतः/अंशतः येणारे विभाग (नवीन लाईन, गेज रूपांतरण आणि दुहेरीकरण) पुढील प्रमाणे कार्यान्वित झाले:
|
कालावधी
|
नवीन मार्गिका कार्यान्वित
|
नवीन मार्गिकांचे सरासरी कार्यान्वयन |
|
2009-14
|
292 किमी.
|
58.4 किमी/वर्ष
|
|
2014-25
|
2,292 किमी.
|
208.36 किमी/वर्ष (3 पेक्षा जास्त वेळा)
|
01.04.2025 पर्यंत, अमरावतीसह महाराष्ट्रात पूर्णतः/अंशतः असलेले एकूण 89,780 कोटी रुपये किमतीचे, 5,098 किमी लांबीचे, 38 प्रकल्प (11 नवीन मार्गिका, 02 गेज रूपांतरण आणि 25 दुहेरीकरण) कार्यान्वित झाले असून, त्यापैकी त्यापैकी मार्च 2025 पर्यंत 2,360 किमी लांबीचे मार्ग सुरू झाले आहेत आणि त्यासाठी 39,407 कोटी रुपये खर्च झाला. सारांश पुढील प्रमाणे:
|
श्रेणी
|
कार्यान्वित झालेल्या प्रकल्पांची संख्या
|
एकूण लांबी
एनएल/जीसी/डीएल (किमी)
|
मार्च’25 पर्यंत कार्यान्वित मार्गिकांची लांबी (किमी.)
|
मार्च’25 पर्यंत एकूण खर्च (कोटी रु.)
|
|
नवीन मार्गिका
|
11
|
1,355
|
234
|
10,504
|
|
गेज रूपांतरण
|
02
|
609
|
334
|
4,286
|
|
दुपदरीकरण/मल्टी ट्रॅकिंग
|
25
|
3,134
|
1,792
|
24,617
|
|
एकूण
|
38
|
5,098
|
2,360
|
39,407
|
महाराष्ट्रात पूर्णतः अथवा अंशतः येणाऱ्या पूर्ण झालेल्या काही प्रकल्पांची माहिती:
|
अनु क्र.
|
प्रकल्प
|
खर्च (कोटी रु.)
|
|
1
|
जबलपूर-गोंदिया गेज परिवर्तन (300 किमी.)
|
2005
|
|
2
|
छिंदवाडा-नागपूर गेज परिवर्तन (150 किमी.)
|
1512
|
|
3
|
पनवेल-पेण दुपदरीकरण (35 किमी.)
|
263
|
|
4
|
पनवेल-रोहा दुपदरीकरण (75 किमी.)
|
31
|
|
5
|
पेण -रोहा दुपदरीकरण (40 किमी.)
|
330
|
|
6
|
उधना-जळगाव दुपदरीकरण (307 किमी.)
|
2448
|
|
7
|
मुदखेड-परभणी दुपदरीकरण (81 किमी.)
|
673
|
|
8
|
भुसावळ-जळगाव तिसरी मार्गिका (24 किमी.)
|
325
|
|
9
|
जळगाव-भुसावळ चौथी मार्गिका (24 किमी.)
|
261
|
|
10
|
दौंड-गुलबर्गा दुपदरीकरण (225 किमी.)
|
3182
|
रेल्वेने भुसावळ-खांडवा तिसरी आणि चौथी मार्गिका (131किमी) हा 3,285 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प हाती घेतला असून, महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यात पूर्णतः/अंशतः येणाऱ्या मूर्तिजापूर-अचलपूर मार्गाच्या गेज रूपांतरण (77 किमी) कामासाठी सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे.
महाराष्ट्रात पूर्णतः/अंशतः येणारे हाती घेण्यात आलेले काही प्रमुख प्रकल्प पुढील प्रमाणे:
|
अनु क्र.
|
प्रकल्पाचे नाव
|
खर्च (₹कोटी)
|
|
1
|
अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ नवीन मार्गिका (261किमी.)
|
4,957
|
|
2
|
बारामती-लोणंदनवीन मार्गिका (64 किमी.)
|
1,844
|
|
3
|
वर्धा-नांदेड नवीन मार्गिका (284 किमी.)
|
3,445
|
|
4
|
धुळे (बोरविहीर)-नरडाणा नवीन मार्गिका (51 किमी.)
|
1,171
|
|
5
|
मनमाड-इंदूर नवीन मार्गिका (309 किमी.)
|
16,321
|
|
6
|
वडसा-गडचिरोली नवीन मार्गिका (52 Km)
|
1,886
|
|
7
|
जालना-जळगाव नवीन मार्गिका (174 किमी.)
|
5,804
|
|
8
|
पुणे-मिरज-लोंडा दुपदरीकरण (466 किमी.)
|
6,463
|
|
9
|
दौंड मनमाड दुपदरीकरण (236 किमी.)
|
30,376
|
|
10
|
मुदखेड - मेडचाळ आणि महबूबनगर - ढोणे विभाग दुपदरीकरण (417 किमी.)
|
4,686
|
|
11
|
होटगी-कुडगी-गदग दुपदरीकरण (284 किमी.)
|
2,459
|
|
12
|
कल्याण-कसारा तिसरी मार्गिका (68 किमी.)
|
1,433
|
|
13
|
वर्धा-नागपूर तिसरी मार्गिका (76 किमी.)
|
698
|
|
14
|
वर्धा-बल्लारशाह तिसरी मार्गिका (132 किमी.)
|
1,385
|
|
15
|
इटारसी- नागपूर तिसरी मार्गिका (280 किमी.)
|
2,450
|
|
16
|
मनमाड-जळगाव तिसरी मार्गिका (160 किमी.)
|
1,677
|
|
17
|
काझीपेट-बल्लारशाह तिसरी मार्गिका (202 किमी.)
|
3,183
|
|
18
|
राजनांदगाव-नागपूर तिसरी मार्गिका (228 किमी.)
|
3,545
|
|
19
|
वर्धा-नागपूर चौथी मार्गिका (79 किमी.)
|
1,137
|
|
20
|
जळगाव-मनमाड चौथी मार्गिका (160 किमी.)
|
2,574
|
या मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांमुळे लाईन क्षमता वाढेल, अतिरिक्त प्रवासी आणि मालवाहतूक उपलब्ध होईल, वस्तू आणि सेवांची जलद वाहतूक शक्य होईल, परिचालनातील अडथळे कमी होतील, लॉजिस्टिक्स कार्यक्षमता सुधारेल, संबंधित प्रदेशातील लोकांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी वाढतील, संबंधित प्रदेशातील पर्यटन उद्योगाला आणि औद्योगिक उपक्रमांना चालना मिळेल.
त्याशिवाय, महाराष्ट्रातील हाय स्पीड बुलेट ट्रेन, या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला आहे. आता 100% जमीन अधिग्रहण पूर्ण झाले आहे. पूल, जलवाहिनी इत्यादी कामे हाती घेण्यात आली आहेत. पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर (डीएफसी) देखील महाराष्ट्रातून जातो. पश्चिम डीएफसीचा सुमारे 178 किमी भाग महाराष्ट्रात असून, तो प्रकल्पाच्या एकूण लांबीच्या 12% आहे. या प्रकल्पाचा महाराष्ट्रातील नवीन घोलवड ते नवीन वैतरणा या टप्प्यातील 76 किमी. लांबीचा मार्ग यापूर्वीच कार्यान्वित झाला आहे. उर्वरित काम हाती घेण्यात आले आहे. डब्ल्यूडीएफसीची जेएनपीटीशी जोडणी, बंदरापासून दिल्ली एनसीआरपर्यंत मालवाहतूक आणि कंटेनर वाहतूक हाताळण्याची क्षमता वाढवेल.
महाराष्ट्रात पूर्णतः अथवा अंशतः येणारे रेल्वे पायाभूत प्रकल्प भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, दक्षिण पश्चिम रेल्वे आणि पश्चिम रेल्वे झोन अंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहेत. रेल्वे प्रकल्पांची विभागीय रेल्वेनिहाय माहिती भारतीय रेल्वेच्या वेबसाइटवर सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे.
केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका बिगर-तारांकित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.
* * *
पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2154733)
अभ्यागत कक्ष : 26