रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्रात 89,780 कोटी रुपये खर्चाच्या 38 रेल्वे प्रकल्पाना मंजुरी; 2,360 किमी पेक्षा अधिक कार्यान्वित


महाराष्ट्रातील हाय - स्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाने 100% भूसंपादन केले साध्य

Posted On: 08 AUG 2025 11:00PM by PIB Mumbai

मुंबई, 8 ऑगस्‍ट 2025 

 

गेल्या काही वर्षांमध्ये अर्थसंकल्पीय तरतुदीत लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. महाराष्ट्र राज्यात असलेले पायाभूत सुविधा प्रकल्प आणि सुरक्षा कामांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद खालीलप्रमाणे आहे:-

कालावधी खर्च
2009-14 वार्षिक 1,171 कोटी रुपये
2025-26 23,778 कोटी रुपये (20 पटीने अधिक)

 

2009-14 आणि 2014-2024  दरम्यान महाराष्ट्र राज्यात पूर्णपणे/अंशतः येणाऱ्या खंडांचे (नवीन लाईन, गेज रूपांतरण आणि दुहेरीकरण) कमिशनिंग खालीलप्रमाणे आहे:-

कालावधी नवीन ट्रॅक कार्यान्वित नवीन ट्रॅकचे सरासरी कमिशनिंग
2009-14 292 किमी 58.4 किमी/प्रतिवर्ष
2014-25 2292 किमी 208.36 किमी/प्रतिवर्ष (3 पटीने अधिक)

 

01.04.2025 पर्यंत, अमरावती जिल्ह्यासह महाराष्ट्रात पूर्णपणे/अंशतः येणारे, 89,780 कोटी रुपये खर्चाचे एकूण 5,098 किमी लांबीचे 38 प्रकल्प (11 नवीन मार्ग, 02 गेज रूपांतरण आणि 25 दुहेरीकरण) मंजूर करण्यात आले आहेत, त्यापैकी 2,360 किमी लांबीचे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत आणि मार्च 2025 पर्यंत 39,407 कोटी रुपये खर्च झाला आहे. सारांश खालीलप्रमाणे आहे:-

C         ategory

No of sanctioned Projects

Total Length

NL/GC/DL

(in Km)

Length Commissioned till Mar'25
(in Km)

Total Exp upto Mar'25

(₹ in Cr)

नवीन मार्ग

11

1,355

234

10,504

गेज रूपांतरण

02

609

334

4,286

दुहेरीकरण / मल्टिट्रॅकिंग

25

3,134

1,792

24,617

एकूण

38

5,098

2,360

39,407         

 

महाराष्ट्रात पूर्णपणे/अंशतः येणारे आणि अलिकडेच पूर्ण झालेल्या  प्रकल्पांची माहिती खालीलप्रमाणे आहे:-

S.No.

Project

Cost (₹ in crore)

1

Jabalpur-Gondia Gauge Conversion (300 Km)

2005

2

Chhindwara-Nagpur Gauge Conversion (150 Km)

1512

3

Panvel-Pen Doubling (35 Km)

263

4

Panvel-Roha Doubling (75 Km)

31

5

Pen-Roha Doubling (40 Km)

330

6

Udhna-Jalgaon Doubling (307 Km)

2448

7

Mudkhed-Parbhani Doubling (81 Km)

673

8

Bhusawal – Jalgaon 3rd Line (24 Km)

325

9

Jalgaon-Bhusawal 4th line (24 Km)

261

10

Daund-Gulbarga Doubling (225 Km)

3182

 

रेल्वेने 3,285 कोटी रुपये खर्चाचा भुसावळ-खांडवा तिसरा आणि चौथा मार्ग (131 किमी) प्रकल्प  हाती घेतला आहे आणि महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात पूर्णपणे/अंशतः येणाऱ्या  मूर्तिजापूर-अचलपूर गेज रूपांतरण (77 किमी) कामासाठी सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील पूर्णपणे/अंशतः येणाऱ्या काही मुख्य प्रकल्पांची कामे खालीलप्रमाणे आहेत:-

S.No.

Name of the project

Cost (₹ In crore)

1

Ahmednagar-Beed-Parle Vaijnath New Line (261 Km.)

4,957

2

Baramati-Lonand New Line (64 Km.)

1,844

3

Wardha-Nanded New Line (284 Km.)

3,445

4

Dhule (Borvihir)-Nardana New Line (51 Km.)

1,171

5

Manmad-Indore New Line (309 Km.)

16,321

6

Wadsa-Gadchiroli New Line (52 Km)

1,886

7

Jalna -Jalgaon New Line (174 Km.)

5,804

8

Pune-Miraj-Londa Doubling (466 Km.)

6,463

9

Daund Manmad Doubling (236 Km.)

30,376

10

Mudkhed - Medchal & Mahbubnagar - Dhone section Doubling (417 Km.)

4,686

11

Hotgi-Kudgi-Gadag Doubling (284 Km.)

2,459

12

Kalyan-Kasara - 3rd line (68 Km.)

1,433

13

Wardha -Nagpur 3rd line (76 Km.)

698

14

Wardha-Ballarshah 3rd line (132 Km.)

1,385

15

Itarsi- Nagpur 3rd line (280 Km.)

2,450

16

Manmad Jalgaon 3rd line (160 Km.)

1,677

17

Kazipet -Ballarshah - 3rd line (202 Km.)

3,183

18

Rajnandgaon-Nagpur 3rd line (228 Km.)

3,545

19

Wardha-Nagpur 4th line (79 Km.)

1,137

20

Jalgaon-Manmad 4th Line (160 Km)

2,574

या मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांमुळे रेल्वेमार्गाची  क्षमता वाढेल, अतिरिक्त प्रवासी आणि मालवाहतूक होईल, वस्तू आणि सेवांची जलद वाहतूक सक्षम होईल, परिचालनातील अडथळे कमी होतील, लॉजिस्टिक्स कार्यक्षमता सुधारेल, प्रदेशातील लोकांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी वाढतील, पर्यटन उद्योग विकसित होईल आणि प्रदेशात औद्योगिक उपक्रम वाढतील.

तसेच, महाराष्ट्रात हाय स्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बांधकामाला गती मिळाली आहे. आता 100% भूसंपादन पूर्ण झाले आहे. पूल, जलवाहिनी इत्यादींचे काम हाती घेण्यात आले आहे.

वेस्टर्न डीएफसी देखील महाराष्ट्रातून जातो. वेस्टर्न डीएफसीचा सुमारे 178 किमी मार्ग महाराष्ट्रात आहे जो वेस्टर्न  डीएफसीच्या एकूण मार्ग लांबीच्या सुमारे 12% आहे. महाराष्ट्रातील नवीन घोलवड ते नवीन वैतरणा या प्रकल्पातील 76 किमी आधीच कार्यान्वित झाले आहे. उर्वरित कामे हाती घेण्यात आली आहेत. डब्ल्यूडीएफसी जेएनपीटीशी जोडल्यामुळे बंदर ते दिल्ली एनसीआर पर्यंत मालवाहतूक आणि कंटेनर वाहतूक हाताळण्याची क्षमता वाढवेल.

महाराष्ट्र राज्यात पूर्ण/अंशतः येणारे रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्प भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे, आग्नेय पूर्व मध्य रेल्वे, दक्षिण पश्चिम रेल्वे आणि पश्चिम रेल्वे विभाग अंतर्गत येतात. रेल्वे प्रकल्पांची विभागीय रेल्वेनिहाय माहिती भारतीय रेल्वेच्या वेबसाइटवर सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गेल्या तीन वर्षांमध्ये म्हणजे आर्थिक वर्ष 2022-23, 2023-24, 2024-25 आणि चालू आर्थिक वर्षात, महाराष्ट्र राज्यात सुमारे 47,126 कोटी रुपये खर्चाचे एकूण 1991 किमी लांबीचे  27 मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत.

केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

पीआयबी मुंबई | शिल्पा नीलकंठ/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2154598) अभ्यागत कक्ष : 90
Read this releasein: English