रेल्वे मंत्रालय
6,600 स्थानकांवरील केंद्रीय सिग्नल नियंत्रणामुळे रेल्वे सुरक्षिततेत वाढ
मुंबई एसी उपनगरीय रेल्वेगाडीचे स्वयंचलित दरवाजे केवळ स्थानकांवरच उघडतात, ज्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता वाढते
2023 च्या तुलनेत 2024 मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये अनैसर्गिक मृत्यूची नोंद झाल्याच्या घटनांमध्ये घट
Posted On:
08 AUG 2025 6:56PM by PIB Mumbai
जीआरपीकडून प्राप्त माहितीनुसार, 2022, 2023 आणि 2024 मध्ये ब्लॉक विभागात अनुक्रमे 1764, 1880 आणि 1692 अनैसर्गिक मृत्यू तर स्थानकांवर 662, 656 आणि 781 अनैसर्गिक मृत्यूची नोंद झाली आहे. या आकडेवारीत गाडीमधून पडणे, अवैध प्रवेश (अनधिकृतपणे रूळ ओलांडणे) आणि खांबावर आदळणे इत्यादी विविध कारणांमुळे झालेल्या मृत्यूंचा समावेश आहे.
मुंबईत स्वयंचलित दरवाजे असलेल्या एसी लोकल गाड्या सुरू करणे हा प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि गर्दीशी संबंधित घटना कमी करण्याच्या दिशेने एक स्वागतार्ह उपक्रम आहे. स्वयंचलित दरवाजे प्रवाशांना फूटबोर्डवर लटकण्यापासून किंवा चालत्या गाडीत चढण्यापासून रोखतात जे प्राणघातक अपघातांचे एक प्रमुख कारण आहे. गाडी चालू असताना हे दरवाजे बंद राहतात आणि गाडी केवळ स्थानकांवर थांबल्यावरच उघडतात, ज्यामुळे पडण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.
मुंबई उपनगरीय रेल्वे सेवांमध्ये पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी, खालील प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे:
|
S.No.
|
Name of Project
|
Length (km)
|
Cost
( Rs. in crore)
|
|
1
|
CSMT-Kurla 5th& 6th Line (MUTP-II)
|
17.5
|
891
|
|
2
|
Mumbai Central-Borivali 6th Line (MUTP-II)
|
30
|
919
|
|
3
|
Extension of Harbour Line from Goregaon-Borivali (MUTP-IIIA)
|
7
|
826
|
|
4
|
Borivali-Virar 5th& 6thLine (MUTP-IIIA)
|
26
|
2184
|
|
5
|
Virar-Dahanu Road 3rd& 4thLine (MUTP-III)
|
64
|
3587
|
|
6
|
Panvel-Karjat suburban corridor (MUTP-III)
|
29.6
|
2782
|
|
7
|
Airoli-Kalwa (elevated) suburban corridor link (MUTP-III)
|
3.3
|
476
|
|
8
|
Kalyan-Asangaon 4th Line between (MUTP-IIIA)
|
32
|
1759
|
|
9
|
Kalyan-Badlapur 3rd & 4th Line (MUTP-IIIA)
|
14
|
1510
|
|
10
|
Kalyan-Kasara 3rd Line
|
67
|
793
|
|
11
|
Naigaon-Juichandra double chord Line
|
6
|
176
|
|
12
|
Nilaje-Kopar double chord Line
|
5
|
338
|
रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत स्थानक योजना सुरू केली आहे. यामध्ये दीर्घकालीन दृष्टिकोनासह स्थानकांचा निरंतर विकास करण्याचा विचार मांडला आहे .
आतापर्यंत, महाराष्ट्र राज्यातील 132 स्थानकांसह 1337 स्थानके या योजनेअंतर्गत विकासासाठी निवडण्यात आली आहेत.
भारतीय रेल्वेमध्ये सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये हाती घेतलेल्या विविध सुरक्षा उपाययोजनांमुळे, अपघातांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. खालील आलेखात दाखवल्याप्रमाणे, परिणामी रेल्वे अपघात 2014-15 मधील 135 वरून 2024-25 मध्ये 31 पर्यंत कमी झाले आहेत.
2004-14 या कालावधीत 1711 (वर्षाला सरासरी 171) महत्वपूर्ण रेल्वे अपघात झाले होते, ज्यात 2024-25 मध्ये 31 पर्यंत आणि 2025-26 मध्ये (जूनपर्यंत) 3 पर्यंत घट झाली आहे.
रेल्वे परिचालनातील सुधारित सुरक्षितता दर्शविणारा आणखी एक महत्त्वाचा निर्देशांक म्हणजे प्रति दशलक्ष ट्रेन किलोमीटर अपघात (APMTKM) प्रमाण जे 2014-15 मध्ये 0.11 होते ते 2024-25 मध्ये 0.03 पर्यंत कमी झाले आहे, जे या कालावधीत सुमारे 73% सुधारणा दर्शविते.

भारतीय रेल्वेवर, सुरक्षेशी संबंधित उपक्रमांवरील खर्चात गेल्या काही वर्षांत खालीलप्रमाणे वाढ झाली आहे:-
|
Expenditure on Safety related activities (Rs. in Cr.)
|
|
|
2013-14 (Act.)
|
2022-23 (Act.)
|
2023-24
(Act.)
|
RE 2024-25
|
BE
2025-26
|
|
Maintenance of Permanent Way & Works
|
9,172
|
18,115
|
20,322
|
21,800
|
23,316
|
|
Maintenance of Motive Power and Rolling Stock
|
14,796
|
27,086
|
30,864
|
31,540
|
30,666
|
|
Maintenance of Machines
|
5,406
|
9,828
|
10,772
|
12,112
|
12,880
|
|
Road Safety LCs and ROBs/ RUBs
|
1,986
|
5,347
|
6,662
|
8,184
|
7,706
|
|
Track Renewals
|
4,985
|
16,326
|
17,850
|
22,669
|
22,800
|
|
Bridge Works
|
390
|
1,050
|
1,907
|
2,130
|
2,169
|
|
Signal & Telecom Works
|
905
|
2,456
|
3,751
|
6,006
|
6,800
|
|
Workshops Incl. PUs and Misc. expenditure on Safety
|
1,823
|
7,119
|
9,523
|
9,581
|
10,134
|
|
Total
|
39,463
|
87,327
|
1,01,651
|
1,14,022
|
1,16,470
|
जून 2025 पर्यंत, भारतीय रेल्वेने रेल्वेचे कामकाज आणि प्रवाशांची सुरक्षितता सुधारण्यासाठी व्यापक सुरक्षा आणि आधुनिकीकरण उपाययोजना राबवल्या आहेत. पॉइंट्स आणि सिग्नल्सचे केंद्रीकृत नियंत्रण करण्यासाठी 6,600 हून अधिक स्थानके इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीमने सुसज्ज करण्यात आली आहेत, ज्यामुळे मानवी चुकांमुळे होणारे अपघात कमी होतात. याव्यतिरिक्त, या संवेदनशील ठिकाणी सुरक्षितता वाढविण्यासाठी 11,096 लेव्हल क्रॉसिंग गेट्स इंटरलॉक केले आहेत, तर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ट्रॅक ऑक्युपन्सीचे निरीक्षण करण्यासाठी 6,640 स्थानकांवर संपूर्ण ट्रॅक सर्किटिंग लागू करण्यात आले आहे.
2020 मध्ये राष्ट्रीय स्तरावर अवलंबण्यात आलेली प्रगत "कवच" ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन प्रणाली हळूहळू तैनात केली जात आहे, ज्यामध्ये दक्षिण मध्य आणि उत्तर मध्य रेल्वेसह महत्त्वाचे मार्ग समाविष्ट असून दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा सारख्या प्रमुख कॉरिडॉरचा विस्तार सुरू आहे. जुलै 2025 मध्ये कोटा-मथुरा विभागात ती यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आली.
उच्च-शक्तीचे रूळ , प्रीस्ट्रेस्ड कॉंक्रिट स्लीपर आणि प्रगत फास्टनिंग सिस्टम यासारख्या आधुनिक ट्रॅक घटकांच्या वापराद्वारे रेल्वेरूळांवरील सुरक्षितता मजबूत करण्यात आली आहे. विशिष्ट यंत्रसामग्रीद्वारे रूळ टाकण्याचे यांत्रिकीकरण मानवी चुका कमी करते. लांब रेल्वे पॅनेलच्या पुरवठ्यामुळे जॉईंट वेल्डिंग कमी होते आणि अल्ट्रासोनिक दोष शोध प्रणालीमुळे वेळेत सदोष रूळ काढणे शक्य होईल. फ्लॅश बट वेल्डिंगसारख्या सुधारित वेल्डिंग तंत्रज्ञानाला पारंपारिक पद्धतींच्या तुलनेत प्राधान्य दिले जाते.
रेल्वेने हाती घेतलेल्या उत्तम देखभाल पद्धती, तंत्रज्ञानविषयक सुधारणा, चांगल्या पायाभूत सुविधा आणि रोलिंग स्टॉक इत्यादींशी संबंधित सुरक्षाविषयक कामांची माहिती खाली दिली आहे:-
मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुढील उपाययोजना केल्या जात आहेत:-
|
S.N.
|
Item
|
2004-05 to 2013-14
|
2014-15 to 2024-25
(till March 25)
|
2014-25 Vs. 2004-14
|
|
|
Technological improvements
|
|
1.
|
Use of high-quality rails (60 Kg) (Km)
|
57,450 Km
|
1.43 Lakh Km
|
More than 2 times
|
|
2.
|
Longer Rail Panels (260m) (Km)
|
9,917 Km
|
77,522 Km
|
Nearly 8 times
|
|
3.
|
Electronic Interlocking (Stations)
|
837 Stations
|
3,691 Stations
|
More than 4 times
|
|
4.
|
Fog Pass Safety Devices (Nos.)
|
As on 31.03.14:
90 Nos.
|
As on 31.03.25: 25,939
|
288 times
|
|
5.
|
Thick Web Switches (Nos.)
|
Nil
|
28,301 Nos.
|
|
|
|
Better maintenance practices
|
|
1.
|
Primary Rail Renewal (Track Km)
|
32,260 Km
|
49,941 Km
|
1.5 times
|
|
2.
|
USFD (Ultra Sonic Flaw detection) Testing of Welds (Nos.)
|
79.43 Lakh
|
2 Crore
|
More than 2 times
|
|
3.
|
Weld failures (Nos.)
|
In 2013-14: 3699 Nos.
|
In 2024-25:
370 Nos.
|
90 % reduction
|
|
4.
|
Rail fractures (Nos.)
|
In 2013-14: 2548 Nos.
|
In 2024-25:
289 Nos.
|
More than 88% reduction
|
|
|
Better infrastructure and Rolling stock
|
|
|
|
|
1.
|
New Track KM added (Track km)
|
14,985 Nos.
|
34,428 Km
|
More than 2 times
|
|
2.
|
Flyovers (RoBs)/ Underpasses (RUBs) (Nos.)
|
4,148 Nos.
|
13,808 Nos.
|
More than 3 times
|
|
3.
|
Unmanned Level crossings
(nos.) on BG
|
As on 31.03.14:
8948
|
As on 31.03.24:
Nil
(All eliminated by 31.01.19)
|
Removed
|
|
4.
|
Manufacture of LHB Coaches (Nos.)
|
2,337 Nos.
|
42,677
|
More than 18 times
|
रेल्वे सोशल मीडिया, डिजिटल आणि प्रिंट मीडियाचा वापर करून प्रवाशांना असुरक्षित पद्धतींपासून सावध करण्यासाठी विविध जनजागृती आणि संवेदनशीलता मोहिमा राबवते. स्थानकांवर लाऊडहेलर आणि सार्वजनिक जनसंबोधन प्रणालींद्वारे वारंवार घोषणा केल्या जातात, ट्रॅक ओलांडणे , चालत्या गाडीत चढणे आणि फूटबोर्डवरून प्रवास करणे टाळण्याविषयी सावध केले जाते. स्थानकांवर रेल्वे डिस्प्ले नेटवर्कवर प्रवासी जागरूकता संबंधी छोट्या चित्रफिती दाखवल्या जात आहेत. जनतेला सावध करण्यासाठी संवेदनशील अनधिकृत प्रवेशाच्या ठिकाणी हिंदी आणि मराठीमध्ये फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले आहेत. अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी अशा ठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ ) कर्मचारी तैनात केले आहेत आणि ट्रेनच्या छतावर, फूटबोर्डवरून किंवा इतर प्रतिबंधित क्षेत्रात प्रवास करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाते.
केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.
***
जयदेवी पुजारी स्वामी/सुषमा काणे/परशुराम कोर
(Release ID: 2154459)
अभ्यागत कक्ष : 14