अणुऊर्जा विभाग
संसदेतील प्रश्नोत्तरे : कर्करोग संशोधन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन
Posted On:
07 AUG 2025 7:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2025
अणुऊर्जा विभागाने, टाटा मेमोरियल सेंटर या आपल्या अनुदान-सहाय्यप्राप्त संस्थेच्या माध्यमातून, कर्करोग संशोधन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी विप्रो जीई हेल्थकेअर सोबत सहकार्यपूर्ण भागिदारी केली आहे. ऑन्कोलॉजी अर्थात कर्करोगाकरता चिकित्सीय प्रतिमा आणि चिकित्सीय कार्यावलीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अनुप्रयोगांसह उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि डिजिटल व्यासपीठे विकसित आणि प्रमाणीकरण करणे, चिकित्सीय प्रतिमांवरील प्रक्रिया आणि त्यांचे विश्लेषणाकरता प्रगत दृश्यीकरण साधनांसाठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर तयार करणे; तसेच अनुप्रयोग विकसित करण्यासाठी माहिती चिन्हांकन सुविधा उपलब्ध करून देणे हा या सहकार्यपूर्ण भागिदारीचा उद्देश आहे.
या सहकार्यपूर्ण भागिदारीअंतर्गत चिकित्सीय प्रतिमा, चिकित्सीय कार्यावली आणि ऑन्कोलॉजी शास्त्रातील प्रगत दृश्यमानता साधनांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अनुप्रयोग विकसित करून ती प्रत्यक्ष अंमलात आणण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.
या सहकार्यपूर्ण भागिदारीअंतर्गत विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता / यंत्र शिक्षण आधारित अनुप्रयोग अंमलबजावणी क्षेत्राच्या बाबतीत हाती घेतले जाणारे विविध संशोधन उपक्रम खाली नमूद केले आहेत: -
i) चुंबकीय अनुनाद प्रतिमा (Magnetic Resonance Imaging – MRI) मधील संशोधन:
- कर्करोगाचे निदान आणि प्रगत जीवशास्त्रीय विश्लेषणासाठी अत्याधुनिक संशोधनाला गती देण्याकरता टाटा रुग्णालयात नवीन सिक्वेन्स (Sequence) वापरात आणणे.
ii) इतर प्रस्ताव:
- आर्टेरियल स्पिन लेबलिंग (Arterial Spin Labeling – ASL) आणि त्रिमितीय चुंबकीय अनुनाद स्पेक्ट्रोस्कोपी (3D Magnetic Resonance Spectroscopy – 3D MRS) वापरून वरच्या टप्प्यातील ग्लिओमात (Gliomas) ट्यूमर पुन्हा उद्भवणे (Tumor Recurrence) आणि विकिरण मृत ऊतक स्थिती (Radiation Necrosis) अर्थात विकिरण उपचारानंतर पेशींचा झालेला ऱ्हास यामधील फरक निश्चित करणे.
- मज्जातंतूशी संबंधित ऑन्कोलॉजी क्षेत्रात केमिकल एक्सचेंज सॅच्युरेशन ट्रान्सफर इमेजिंगच्या (Chemical Exchange Saturation Transfer Imaging – CEST Imaging) संभाव्य भूमिकेबद्दल संशोधन करणे.
- डोके आणि मानेच्या कर्करोगात, सखोल शिक्षण तंत्रज्ञानाचा वापर करून मेटास्टेटिक नोड्स अर्थात कर्करोगग्रस्त लसिका ग्रंथींविषयीचा अंदाज मांडणे.
- डोके आणि मानेच्या कर्करोगात, सिंगल शॉट ईपीआय (Single Shot Echo Planar Imaging – Single Shot EPI) आणि मल्टीशॉट ईपीआय डिफ्यूजन-वेटेड इमेजिंग (Multishot Echo Planar Imaging Diffusion-Weighted Imaging – Multishot-EPI DWI) मधील प्रतिमा गुणवत्तेची गुणात्मक आणि परिमाणात्मक तुलना मांडणे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
निलिमा चितळे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2153864)