रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सिंहस्थ कुंभ मेळा 2027 पूर्वी नाशिकसाठी प्रमुख रेल्वे पायाभूत सुविधांच्या सुधारणांची घोषणा


रस्ते वाहतूक सुलभ करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात 393 कोटी रुपये खर्चाचे 18 रेल्वे मार्गावर रस्ते उड्डाणपूल (ROB)/रेल्वे मार्गाखालील रस्ते (RUB) पूलांना मंजूरी

प्रविष्टि तिथि: 06 AUG 2025 11:10PM by PIB Mumbai

मुंबई, 6 ऑगस्ट 2025


नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभ मेळा 2027 च्या यशस्वी आयोजनानासाठी, नाशिक आणि जवळील स्थानकांवर खाली नमूद विकासकामांचे नियोजन करण्यात आले आहे :

1. नाशिक रोड

नाशिक रोड इथे पूर्वेकडील बाजूस स्थानक  इमारतीचे बांधकाम.

12 मीटर रुंद रूफ प्लाझा आणि 6 मीटर रुंद पादचारी पूल
 
पार्किंग, थांबा आणि प्रतीक्षा क्षेत्रांसाठी माल गोदाम  परिसराचा विकास,  2 स्टेबलिंग मार्गिकांची तरतूद, यार्ड नूतनीकरणाची काम

मेळा टॉवर नियंत्रण केंद्र,स्वच्छतागृहे, आरसीसी ओव्हरहेड टाकी आणि भूमिगत टाकीची तरतूद ,फलाटांचे आधुनिकीकरण आणि प्रवाशांच्या येण्या-जाण्याच्या परिसराची सुधारणा

2. देवळाली

सर्व सोयीसुविधांनी सज्ज 2 अतिरिक्त फलाट,

2 पादचारी पूल आणि लूप लाईन्सचा विस्तार
 
2 पिट मार्गिका,

2 सिक मार्गिका आणि 3 स्टेबलिंग मार्गिकांची तरतूद

अतिरिक्त फलाट शेल्टर्स, प्रवाशांच्या येण्या-जाण्याच्या परिसराची सुधारणा, पार्किंग क्षेत्र, स्वच्छतागृहे, लिफ्टची तरतूद, मानक फलक , प्रवेशद्वार, प्रवेशासाठी व्हरांडा, संरक्षक भिंत आणि सुधारित प्रकाश व्यवस्था, नवीन आरसीसी ओव्हरहेड टाकी, भूमिगत टाकीसह स्वच्छतागृहे

3. ओढा

6 मीटर रुंदीचे 2 पादचारी पूल, स्वच्छतागृहे, फलाट शेल्टर्सची तरतूद, आरसीसी ओव्हरहेड टाकी आणि भूमिगत टाकीची तरतूद, अतिरिक्त लूप मार्गिका, 5 स्टेबलिंग मार्गिका आणि 2 लांब लूप मार्गिकांची व्यवस्था

4. खेरवाडी

सध्याच्या फलाटांचा पूर्ण लांबीच्या फलाटांपर्यंत विस्तार

2 नवीन पूर्ण लांबीचे फलाट

6 मीटर रुंदीचे 2 पादचारी पूल,

स्वच्छतागृहे, दोन नव्या उंच फलाटांची तरतूद, फलाटांचा नव्या उंचीवर  विस्तार आणि उंची वाढवणे, तसेच आरसीसी ओव्हरहेड टाकी आणि भूमिगत टाकीची तरतूद

5. कसबे- सुकेणे

सध्याच्या फलाटांचा पूर्ण लांबीच्या फलांपर्यंत विस्तार

6 मीटर रुंदीचे 2 पादचारी पूल

स्वच्छतागृहे, सध्याच्या फलाटांचा विस्तार, फलाट शेल्टर्सची तरतूद, आरसीसी ओव्हरहेड टाकी आणि भूमिगत टाकीची तरतूद

सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान अधिक गाड्या चालवता याव्यात, यासाठी नाशिक परिसरात रेल्वे नेटवर्कची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने पुढील कामे हाती घेण्यात आली आहेत:

अनु क्र.       काम

1.   मनमाड- जळगाव स्वयंचलित सिग्नलिंग (160 किमी)

2.   मनमाड-जळगाव तिसरी मार्गिका (160 किमी) आणि मनमाड यार्डचे रीमॉडेलिंग

3.   मनमाड येथील रेल्वे उड्डाणपुलावर रेल्वे मार्ग (11 किमी)

4.   भुसावळ यार्ड रीमॉडेलिंग

5.   भुसावळ-बडनेरा-वर्धा-नागपूर स्वयंचलित सिग्नलिंग (393 किमी)

6.   नरडाणा- धुळे नवीन मार्गिका (51 किमी)

7.   कल्याण- आसनगाव तिसरी व चौथी मार्गिका (32 कि.मी.)

8.   आसनगाव- कसारा तिसरी मार्गिका (35 किमी)

9.   जळगाव- मनमाड चौथी मार्गिका (160 किमी)

10. पुणतांबा - साईनगर शिर्डी दुपदरीकरण (17 किमी)

11. दौंड- मनमाड दुपदरीकरण (247 किमी)

12. पुणे कोचिंग टर्मिनसचा विस्तार

13. हडपसर आणि खडकी सॅटेलाईट टर्मिनल

14. शिर्डी कोचिंग यार्डचे रिमॉडेलिंग

त्याशिवाय, नाशिकची रेल्वे कनेक्टिविटी  सुधारण्यासाठी विस्तृत  प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी पुढील सर्वेक्षणांना मान्यता देण्यात आली आहे:
1.   नाशिक - शिर्डी नवीन मार्गिका  (95 किमी)

2.   नाशिक-त्र्यंबकेश्वर-डहाणू रोड नवीन मार्गिका (100 किमी)

3.   कसारा - आसनगाव चौथी मार्गिका (35 किमी)

4.   मनमाड- आसनगाव तिसरी व चौथी मार्गिका (131 कि.मी.)

5.   भुसावळ - वर्धा तिसरी व चौथी मार्गिका (314 कि.मी.)

रस्ते वापरकर्त्यांची गतिशीलता सुधारण्यासाठी, नाशिक जिल्ह्यात 393 कोटी रुपये खर्चाचे 18 आरओबी/आरयूबी मंजूर करण्यात आले असून, ते नियोजन आणि अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर आहेत.

सध्या नाशिक रोड साठी  138 रेल्वे सेवा आहेत तर देवळालीसाठी 14 रेल्वे सेवा आहेत. या सेवा  मुंबई, दिल्ली, सिकंदराबाद, पाटणा, कोलकाता इत्यादी प्रमुख शहरांबरोबर कनेक्टिविटी प्रदान करत आहेत.

शिवाय, नाशिक रोड येथील प्रवाशांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या 17 विशेष गाड्या देखील चालवल्या जात आहेत. याशिवाय सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात कमी पल्ल्याच्या आणि लांब पल्ल्याच्या विशेष गाड्यांचेही नियोजन करण्यात आले आहे.

केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

सुषमा काणे/तुषार पवार/राजश्री आगाशे /प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2153389) आगंतुक पटल : 24
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English