संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मेरीटाईम हिस्ट्री सोसायटीच्या दुसऱ्या मॉनसून म्युझिंग्ज व्याख्यानाचे शीर्षक –“कुंजली मरक्कर यांचा सागरी वारसा : मालाबार किनाऱ्याचे रक्षणकर्ते”


दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी आयएनएचएस अश्विनी येथे अगस्त्य सभागृहात कमोडोर जी.प्रकाश यांच्या व्याख्यानाचे आयोजन

Posted On: 04 AUG 2025 9:33PM by PIB Mumbai

मुंबई, 4 ऑगस्ट 2025

मेरीटाईम हिस्ट्री सोसायटी (एमएचएस) हा पश्चिम नौदल कमांडचा शैक्षणिक उपक्रम असून त्याची स्थापना 12 मे 1978 रोजी झाली. भारताचा समृद्ध सागरी वारसा अभ्यासण्याच्या, जपण्याच्या आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने ही संस्था विविध साहित्य, परिसंवाद, अभ्यास, वारसा फेरी, वृत्त पत्रिका आणि सागरी विषयांवरील उपक्रमांद्वारे कार्यरत आहे.

प्रत्येक वर्षी, मेरीटाईम हिस्ट्री सोसायटी पावसाळ्यात  त्रैवार्षिक मॉनसून म्युझिंग्ज व्याख्यानमाला आयोजित  (एमएमएल) करते. प्राचीन काळापासून आधुनिक युगापर्यंतच्या विविध सागरी विषयांवर हे व्याख्यान आधारित असते. व्याख्यानमालेतील वक्ते हे प्रख्यात सागरी इतिहासकार, नौदल अधिकारी आणि अभ्यासक असून, त्यांच्या सखोल अनुभवातून आणि अभ्यासातून सागरी वारशाचे विविध पैलू उलगडले जातात. याला विद्यार्थ्यांसह, नौदल अधिकारी, इतिहासतज्ज्ञ आणि सागरी वारशाविषयी रुची असलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

एमएमएल 2025 मालिकेतील पहिले व्याख्यान “चोल साम्राज्याची सागरी महाशक्ती” या विषयावर प्रख्यात इतिहासकार डॉ. राधिका शेषन यांनी 9 जुलै 2025 रोजी दिले होते.

या मालिकेतील दुसरे व्याख्यान आहे –

“कुंजाली मरक्कर यांचा सागरी वारसा : मालाबार किनाऱ्याचे रक्षणकर्ते”

हे व्याख्यान नौदल प्रतिष्ठान, मुंबई विभाग यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले असून, 06 ऑगस्ट 2025 रोजी आयएनएचएस अश्विनीच्या अगस्त्य सभागृहात कमोडोर जी. प्रकाश( एनएम - निवृत्त) यांच्याकडून सादर केले जाणार आहे.

नौदल प्रतिष्ठान, मुंबई विभाग हा निवृत्त नौदल कर्मचाऱ्यांसाठी एक समर्पित मंच असून, ते सागरी आणि नौदल विषयांशी सातत्याने निगडित राहण्यासाठी कार्य करतात. प्रतिष्ठानद्वारे विविध धर्मादाय, सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवले जातात.

या व्याख्यानात कमोडोर जी. प्रकाश झमोरीन साम्राज्याचे पारंपरिक नौदल सेनापती – कुंजाली मरक्कर यांची पराक्रमाची गाथा, तसेच त्यांनी पोर्तुगीजांविरुद्ध केलेला सातत्यपूर्ण सागरी प्रतिकार यांचा इतिहास अभ्यासपूर्ण पद्धतीने उलगडणार आहेत.

कमोडोर जी. प्रकाश हे भारतीय नौदलातील निवृत्त हवाई ऑपरेशन्स अधिकारी असून, पाणबुडी युद्धतंत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यांनी नौदलात 30 वर्षांहून अधिक काळ उत्कृष्ट सेवा बजावली आहे.

 

निलीमा चितळे/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2152364) अभ्यागत कक्ष : 7
Read this releasein: English